इंदापूर : मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसींची एल्गार सभा इंदापुरात झाली. या सभेत ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली. तर काही ओबीसी नेत्यांनी सरकारला देखील इशारा दिला. यातच तुम्ही एक भुजबळ पाडाल पण आम्ही १६० मराठे आमदार पाडू असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. त्यावरून आता ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…कोल्हापुरात सतेज पाटलांची ”फिल्डिंग” भाजपला जड जाणार; पाटलांनी जिल्ह्यात उभारलं कार्यकर्त्यांचं नवीन जाळं
शिंदे, फडणवीस, अजितदादा तुमचे ड्रोन पाठवा आणि बघा इथे ओबीसी किती जमलाय. ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. तुम्ही एक भुजबळ पाडाल तर पण आम्ही १६० आमदार पाडू. १६० पैकी जतमध्ये जाऊन मी एकच कार्यक्रम करून आलो. आता दौंडमध्ये मराठा आमदार आहे, त्याचा पण कार्यक्रम करू. आता सर्व ओबीसी एकत्र झालेत. त्यामुळे आता यांचा सरपंच पण निवडून येत नाही. दौंड तालुक्यात १२ पैकी ११ ओबीसी सरपंच निवडून आले फक्त एक मराठा आला. अशी टिका माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
हेही वाचा..“सरकारला पश्चाताप करावा लागेल, फडणवीसांना उघडं पाडू,” जरांगे पाटलांनी दिला इशारा
दरम्यान, अंतिम सत्य हेच आहे की सत्ता हवी. दुसऱ्याच्या पक्षात बसून निर्णय घेऊ नका. नवीन पक्ष तयार करावा लागेल. निवडणूक आधी हा निर्णय घ्यावा लागेल. असे आवाहन माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी केले. राज्यात वातावरण चांगले आहे. सत्तेत आपली माणसे बसणार नाहीत. तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. खासदारापासून सुरूवात करा. तेव्हा कुठे आमदारपर्यंत पोहोचू. मला कुणी मालक नाही. मीच माझ्या पक्षाचा मालक आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. असे आश्वासनही त्यांनी छगन भुजबळांना दिले.
READ ALSO :
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
हेही वाचा…“तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं”; भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंच्याच २२ आमदारांच्या सह्या, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
हेही वाचा…शिंदे सरकारचा अनगोंदी कारभार, देशाचा तिरंगा कार्यक्रमात लावला उलटा ; विरोधकांची सडकून टिका