मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास एक ते दीड महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर सातत्याने टिका केली. तसेच आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा छोटेखानी शपथविधी होणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातून 9 तर भाजपकडून 9 असे एकूण 18 मंत्री शपथ घेतली आहे. यातच शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चित्रा वाघ य़ांच्यावर टिका केली आहे.
“मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
कधीकाळी चारित्र्यहीन म्हणून भाजपने ज्यांचा राजीनामा घेतला. ते संजय राठोड आज फडणविसांच्या (पर्यायाने शिंदे गटाच्या ) मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेत आहेत. योगायोगाने रक्षाबंधन जवळच आहे, चित्रा ताई भाजपमध्ये जाऊन पवित्र झालेल्या आपल्या लाडक्या भावाला नक्की ओवाळतील. असं म्हणत प्रशांत जगताप यांनी चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला
पुजा चव्हाण प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये त्यांना मंत्रिपदाचा यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तसेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ य़ांनी संजय राठोड यांच्यावर सातत्याने आरोप टिका करीत होत्या. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यानंतर त्यांनी टिका केली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
चित्रा वाघ म्हणाल्या की, पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, असं म्हणत त्यांनी संजय राठोड यांना इशारा दिला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नव्या सरकारमध्ये कलंकित मंत्री नको अशी भूमिका घेण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र शेवटच्या क्षणी संजय राठोड यांना मंत्रीपदी वर्णी लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर दोन दिवसा अगोदर टीईटी परिक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचं नाव आल्यानंतर त्यांचं मंत्रीपद हुकणार की काय ? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता.
कधीकाळी चारित्र्यहीन म्हणून भाजपने ज्यांचा राजीनामा घेतला ते संजय राठोड आज फडणविसांच्या (पर्यायाने शिंदे गटाच्या ) मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेत आहेत.
योगायोगाने रक्षाबंधन जवळच आहे, चित्रा ताई भाजपमध्ये जाऊन पवित्र झालेल्या आपल्या लाडक्या भावाला नक्की ओवाळतील.— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) August 9, 2022
Read also
- मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
- TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
- एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
- औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
- “इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता