पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. ललित ड्रग्ज प्रकरण ताजे असतांनाच पुणे पोलिसांनी इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल ४ हजार कोटी रूपयांचं दोन हजार कोटी एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून जप्त केले आहे. त्यामुळे शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे पंजाबच्या वाटेवर चाललंय का ? असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे.
हेही वाचा…“तर मी साडीचा पदर खोचून उभी आहे”, नवनीत राणांनी थेट जलील यांना दिलं आव्हान
पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन दिवसांपुर्वी ३ तीन जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे आरोपींच्या नावं असून त्यांच्याकडून कोट्यावधीचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यावरून शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्याची ओळख बदलून ड्रग्ज राजधानी होतंय का ? अशी शंका आता वाटू लागली असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजप पुन्हा मलाच संधी देणार, भाजप खासदार ‘हिना गावित’ हॅट्रिक साधणार का ?
दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं २००० किलो एमडी ड्रग्ज जप्त होण्याची पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे खरंतर पुणे पोलिसांनी शरमेनं मान खाली घालण्यासारखी गोष्ट आहे. शहराच्या आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा पोहोचेपर्यंत पुणे पोलीस विभाग नक्की काय करत होतं? असा सवाल करत अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कसे सापडले? कुणाच्या आशीर्वादाने आजवर हा कारभार सुरू होता? अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुणा केला जातोय? असा रोखठोक सवाल देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल
पुण्यात महाराष्ट्रातील कानाकोप-यातून मुलं-मुली शिकायला येतात, हे विद्यार्थी या ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटप्रकरणी अटक आरोपी ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांचं पुढे काय झालं? कुणाशी त्यांचे लागेबंधे होते, हे अद्याप प्रकाशझोतात आलेलं नाही. केवळ कारवाईची हेडलाईल मिळवून काहीही साध्य होणार नाही. अमली पदार्थ पुरवठादार, ग्राहक आणि कुणाच्या वरदहस्ताने हे सुरू आहे याचे धागेदोरे शोधून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करायला हवी. अशी मागणी देखील त्यांनी केलीय.
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख बदलून ड्रग्ज राजधानी होतंय का, अशी शंका वाटू लागलेय.
दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं २००० किलो एमडी ड्रग्ज जप्त होण्याची पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे खरंतर पुणे पोलिसांनी शरमेनं मान खाली घालण्यासारखी गोष्ट… pic.twitter.com/2GS5cPFikT
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 21, 2024
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांचा पुतण्या ‘सुप्रिया सुळें’चा प्रचार करणार, बारामतीत राजकीय संघर्षाला सुरूवात
हेही वाचा…शरद पवारांनी सुनील तटकरेंच्या विरोधात डाव टाकला, तटकरेंच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी
हेही वाचापहिल्यांदाच सुप्रिम कोर्टाने भाजपलं खडसावलं, चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव
हेही वाचा…बाबाने कॉंग्रेसला राम राम ठोकला, कॉंग्रेसने सुपुत्राची केली उचलबांगडी, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाराज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, भाजपचे तीन तर कॉंग्रेस, शिवसेना, अन् राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी