बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर आता पवार कुटुंबात देखील दरी निर्माण होत आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार आणि तो निवडून आणणारच असं जाहीर विधान अजित पवारांनी बारामतीत केलं. यासाठी आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार दोघेही उद्यापासून प्रचार करण्यास सुरूवात करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा पुतण्या सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार असल्याने बारामतीत खऱ्या राजकीय संघर्षाला सुरूवात झालीय.
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजप पुन्हा मलाच संधी देणार, भाजप खासदार ‘हिना गावित’ हॅट्रिक साधणार का ?
अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवारांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी आपण साहेबांसोबत आहोत आणि आगामी लोकसभा निवडणुकीत साहेब सांगतील तसं आम्ही सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार. असे युगेंद्र पवार यांनी सांगितलं आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या सारखा अभ्यासु खासदार मिळणं हे बारामतीकरांसाठी खरोखरच भाग्य आहे. त्याला नशीब लागतं. असेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल
बारामतीच्या मेळाव्यात मला पवार कुटुंबातून एकटं पाडलं जातंय. असे अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यावर पक्षात फुट झाली. तरीही पवार परिवार एकत्रच आहे. याठिकाणी कुणालाही एकटं पाडलं गेलं नाही. राजकारणाबाबत देखील युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं. भविष्यात साहेबांनी संधी दिली तर राजकारणात नक्की येऊ. तेव्हाच तेव्हा बघू. असं म्हणत त्यांनी राजकारणात येण्याचा सुचक संकेत देखील दिला आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामाना रंगण्याची शक्यता आहे. कारण मागील काही दिवसांपासून याठिकाणी अजित पवार गटाने प्रचार सुरू केला असून सुनेत्रा पवार यांची माहिती असलेला विजय रथ देखील शहरात दाखल झाला आहे. सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी अजित पवारांनी बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गट देखील याठिकाणी चांगलाच सक्रीय झालाय.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांनी सुनील तटकरेंच्या विरोधात डाव टाकला, तटकरेंच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी
हेही वाचापहिल्यांदाच सुप्रिम कोर्टाने भाजपलं खडसावलं, चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव
हेही वाचा…बाबाने कॉंग्रेसला राम राम ठोकला, कॉंग्रेसने सुपुत्राची केली उचलबांगडी, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाराज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, भाजपचे तीन तर कॉंग्रेस, शिवसेना, अन् राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी
हेही वाचा…“तर मी साडीचा पदर खोचून उभी आहे”, नवनीत राणांनी थेट जलील यांना दिलं आव्हान