बुलढाणा : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? गेल्या अनेक महिन्यांपासून निष्पाप लोकांचा गेला जीव
सरकार म्हणून समृद्धी मार्गावर सुरक्षा नाही. मदत नाही पेट्रोल पंप नाही.पाणी अन्न नाही. रूग्णवाहिका नाही. पोलिसांची गस्त नाही. आता म्हणतील हे सगळ्या कशाला हवंय तुम्हाला गतिमान सरकार आहे ना. गतिमान नागरिकांचे जीव घेणारच. अरे सरकार म्हणून राज्य चालवण्याची काडीची अक्कल नाही. असंही रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आम्ही शिवबाचे मावळे..! मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांचे AI मधील फोटो व्हायरल
दरम्यान, गेल्या वर्षाभरामध्ये समृद्धी महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढले आहेत. आज पंचवीस लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्गे बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले. त्या अनेक गोष्टी आहेत. भविष्यात त्या समोर येतील. दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होतात, लोकांचा मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
सरकार म्हणून समृद्धी मार्गावर
सुरक्षा नाही,मदत नाही
पेट्रोल पंप नाही,पाणी अन्न नाही, रुग्णवाहिका नाही. पोलिसांची गस्त,,????😢😢😢
आता म्हणतील हे सगळ कशाला हवंय तुम्हाला
गतिमान सरकार आहे ना गतिमान नागरिकांचे जीव घेणारच
अरे सरकार म्हणून राज्य चालवण्याची काडीची अक्कल नाहीये यांना.— Rupali patil thombare (@Rupalispeak) July 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मणिपुरमध्ये जाऊन राहुल गांधींनी डर मत चा संदेश दिलाय, ही कृती प्रगल्भ नेत्यांचं दर्शन घडवणारी”
हेही वाचा…“बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणतांना जनाची नाही तर..” राऊतांच्या टिकेनंतर भाजपचा निशाणा
हेही वाचा..“समृद्धी महामार्गासाठी अनेकांच्या जमिनी हडपल्या, शाप आणि अश्रू त्यात, हा शापित महामार्ग,” संजय राऊत
हेही वाचा…शिंदे-फडणवीस प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल, समृद्धी महामार्गावर बस अपघात घटनेच्या चौकशीचे आदेश
हेही वाचा…“आजचा दिवस दुःखाचा..,” भाजपकडून मुंबईतील ”आक्रोश आंदोलन” मागे घेण्याची घोषणा