कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्यासाठी बोरगावमध्ये होणार संस्थापक पॅनल आणि सहकार पॅनल मध्ये काटे की टक्कर
हे पण वाचा, डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला
२०१० साली कारखान्याच्याराजकारणात एका अत्यंत बेजाबदार नेतृत्वाची उडी झाली आणि राजकीय अपघाताने उदयास आलेले नेतृत्व आता कारखान्यातून हद्दपार करावे असे आवाहन डॉ. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सभासदांना केले आहे. २०१० साली राजकीय डावपेचाचा आधारे आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याने केलेल्या प्रगतीचा हेवा वाटणाऱ्या राजकीय शक्तींनी एकत्रित येऊन हे नेतृत्व आपल्या उरावर लादले. या नेतृत्वाच्या काळात कारखान्याच्या बाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले होते.
हे पण वाचा, कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी भोसले विरुद्ध मोहिते गटात रंगणार कलगीतुरा
कारखान्याच्या मयत सभासदांच्या शेअर ची रक्कम त्यांच्या वारसांना देण्याचा कारखान्याचा नियम असताना त्यात पक्षपातीपणा केला गेला आणि संपूर्ण दुर्लक्ष या प्रक्रियेकडे करण्यात आले. नवीन सभासद राजकीय हेतूंमधून नोंदण्यात आले. तोडणी, वाहतुकीच्या प्रक्रियेमध्ये ९७ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून त्यांना अक्रियाशील करण्याचं षडयंत्र करण्यात आलं. २०१५ साली नवीन संचालक मंडळ आल्यानंतर देखील या प्रक्रियेला त्यांच्याकडून विरोध करण्यात आला नाही. कार्यकर्त्यांना सभासदांना अक्रियाशील करण्याचा ठरावाला दोन्ही नाण्यांच्या बाजूने संमती दिली गेली. २०१५ साली सत्तेत आलेल्या संचालक मंडळाच्या मांडीला मांडी लावून चुकीचे काम करण्याचा प्रयत्न देखील झाला असा टोला अविनाश मोहिते यांचे नाव न घेता मारला आहे.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?