मुंबई: विधिमंडळ बांधकाम समितीची आज २२ जून रोजी बैठक होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत इतर नेतेमंडळी विधानभवनात आले होते. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने सध्या शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्याचे सत्र सुरु केले आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष टीका करत आहे मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचे नेते आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण विधानभवनात दिसून आले आहे.
हे पण वाचा, हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
हे पण वाचा, “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
विधिमंडळ कामकाज समितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः गाडी चालवत विधान भवनातून निघाले असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली आहे. प्रथम प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि नंतर मुख्यमंत्री ठाकरे निघाले असता गिरीश महाजन लगबगीने पुढे येत त्यांच्याशी बोलले. यावेळी मागून येत असलेल्या गाडीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि त्यावेळी त्यांच्यात रंगलेला संवाद खूप काही बोलून जाण्यासारखं होता.
हे पण वाचा, आम्ही स्वबळावर लढू, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी; शुभेच्छा!!
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव साहेब , यांनी तुम्हाला घरेण्याचा प्रयत्न केला आहे का ? असे प्रवीण दरेकर यांना विचारले असता , आम्ही केव्हाही जवळ येऊ शकतो असं म्हटलं .आणि त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी तुम्हाला आताच गाडीत टाकतो आणि शिबबंधन बांधून घेऊ असे म्हटले. त्यावर प्रवीण दरेकर यांनी आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो , हे आमचं मूळ आहे असे म्हटल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांमधील कटुता काहीशी कमी झालेली आहे असेच दिसते आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून युतीच्या बाबतीत होणारी विधाने खूप काही सांगून जात असल्याने आगामी काळात युती होते की काय हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
- मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नाना पटोलेंवर नाराज? आघाडीत अस्वस्थता वाढली!
- विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका; भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप
- खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती
- उच्च न्यायालायने पोलीस आयुक्तांना दिले, संजय राऊत यांच्या चौकशीचे आदेश
- महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका