पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांची तक्रार केली. महिलांविरोधात अश्लिल भाषेत टिका केली जात असतांनाही विरोधी पक्षातील नेत्यांनी विधीमंडळात हा विषय काढला नाही. असं म्हणत सुषमा अंधारे भावुक झाल्या. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुषमा अंधारे यांच्यावर टिकास्त्र सोडलं जात आहे.
हेही वाचा…“सकाळचा भोंगा रोज बघतो, पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही”, श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टिका
राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, अजित दादा माता भगिंनींचा पाठीशी उभे असणारे खमके भाऊ आहेत. सुषमा ताई आपण महाविकास आघाडीच्या आधारवड मोठ्या साहेबांसमोर भावुक झाल्यात. पण अजित दादांबद्दल मनाला न पटणारे आणि त्यावेळी अधिवेशन सुरू नव्हतेच. विरोधी पक्षनेते तुमच्या पक्षाचे अंबादास भाऊ दानवे सुद्धा आहे मग तक्रार कोणाबद्दल ? असा खोचक सवालही रूपाली पाटील यांनी केला.
हेही वाचा…“संजय राऊत आता शरद पवारांनंतर राहुल गांधींची चाकरी करताहेत”
सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी देखील भाष्य केलं आहे. सकाळी ६ पासून सातत्याने जनतेच्या सेवेत असणारे नेत म्हणजे अजित दादा. हल्ली त्यांच्यावर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आला आहे. दादा विरूद्ध रडलो तरी मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो. रडरागिणी रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते. असं म्हणत मिटकरी यांनी सुषमा अंधारे यांना डिवचलं आहे.
अजित दादा माता भगिनींचा पाठीशी उभे असणारे खमके भाऊ आहे.सुषमा ताई आपण महाविकास आघाडीच्या आधारवड मोठयासाहेबां समोर भावुक झालात पण मा. अजित दादांन बद्दलचे मनाला न पटणारे आणि त्यावेळी अधिवेशन सुरू नव्हतेच.विरोधीपक्ष नेते तुमच्या पक्षाचे अंबादास भाऊ दानवे सुद्धा आहे मग तक्रार कोणाबदल?
— Rupali patil thombare (@Rupalispeak) May 10, 2023
सकाळी 6 पासुन सातत्याने जनतेच्या सेवेत असणारे नेते म्हणजे अजितदादा! हल्ली त्यांच्यावर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आलाय.दादा विरुद्ध “रडलो” तरी मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो! #रडरागिणी
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…Karnataka Election 2023..! “कर्नाटकात मोदी अन् शहांनी घाम अन् पैसा गाळूनही त्यांचा पराभव होईल”
हेही वाचा…“निवडणुकीत अजित पवारांचा हात लागतो, नाहीतर ती जिंकता येत नाही”,अमोल कोल्हेंनी केले पवारांचं कौतुक
हेही वाचा…“आम्हाला शुन्यातून सुरूवात करायचीय, म्हणून, आम्ही आता… ” शरद पवारांनी केलं मोठं विधान, एकच चर्चा
हेही वाचा…..“संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याचा आजार जडलाय”, संजय शिरसाठ
हेही वाचा…“शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार”, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया