मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज १० मे रोजी मतदान होत आहे. येत्या १३ तारखेला या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. कर्नाटकातील २२४ मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून महाराष्ट्राच्या सीमेला असणाऱ्या बेळगावातही १८ मतदारसंघासाठीही मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निशाण्यावर घेतलं आहे.
हेही वाचा…“संजय राऊत आता शरद पवारांनंतर राहुल गांधींची चाकरी करताहेत”
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे. कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारूण पराभव होत आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे. तसेच आजचा दिवस म्हणजे २०२४ साठी शुभ शकून आहे. दुख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठई कारस्थाने केली. असा आरोपही राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…“अनेकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचे चॉकलेट पुन्हा दाखवण्यात येतील”
पुढे बोलतांना त्यांनी असं म्हटलं आहे की, स्वत: ला शिवसेना म्हणवून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे. मराठी माणुस हे लक्ष्यात ठेवील असंही राऊतींनी निश्चून सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निवडणुकीत अजित पवारांचा हात लागतो, नाहीतर ती जिंकता येत नाही”,अमोल कोल्हेंनी केले पवारांचं कौतुक
हेही वाचा…“आम्हाला शुन्यातून सुरूवात करायचीय, म्हणून, आम्ही आता… ” शरद पवारांनी केलं मोठं विधान, एकच चर्चा
हेही वाचा…..“संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याचा आजार जडलाय”, संजय शिरसाठ
हेही वाचा…“शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार”, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सकाळचा भोंगा रोज बघतो, पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही”, श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टिका