IMPIMP

मुंबई लोकल सेवा लवकरच सर्वांसाठी सुरू करणार – उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतील लोकल रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर 10 महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरीही अद्याप सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार ? हा एकच प्रश्न मुंबईकर सातत्याने विचारत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे म्हटले आहे.

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे ते यावेळी म्हणाले.

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर सर्व गोष्टी हळूहळू शिथिल करण्यात आल्या असल्या तरी लोकल पूर्णपणे सूर करण्यात आल्या नाहीत. काही ठराविक कर्मचारी वर्ग आणि महिलांसाठी लोकल सुरू झाल्या होत्या. आता मुख्यमंत्र्यांनीच लोकलचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशा प्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Read Also :