पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘दादा माणूस’ असलेल्या भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आपल्या राजकीय जीवनातील निवृत्ती ही भारतीय जनता पार्टीमध्येच होईल, अशी रोखठोक भूमिका मांडली आहे.‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाने आमदार महेश लांडगे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हे पण वाचा, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या राम-लक्ष्मणाची जोडी सज्ज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकीटावर २००४, २००७, २०१२ असे सलग तीनदा निवडून आलेल्या लांडगे यांनी २००९ मध्ये पक्षाकडे विधानसभेच्या तिकीटाची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीने तिकीट नाकारले. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा राष्ट्रवादीसह प्रमुख पक्षांकडे तिकीटाची मागणी केली. मात्र, त्यावेळीही सर्वच पक्षांनी तिकीटाबाबत उदासीनता दर्शवली. कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतकांच्या आग्रहामुळे अखेर २०१४ मध्ये आम्ही भोसरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला. संपूर्ण निवडणुकीत एकच जाहीर सभा घेता आली. पण, एकमेव सभेला अभूतपूर्ण प्रतिसाद मिळाला, आम्ही विजयश्री खेचून आणली, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा, ठाकरे सरकारने गृह विलगीकरणाचा निर्णय बदलला, आमदार महेश लांडगेंच्या प्रयत्नांना यश
पुढे बोलतांना लांडगे म्हणाले की, २०१४ मध्ये तिकीट घ्या, अशी ऑफर प्रमुख पक्षांनी दिली होती. मात्र, तत्पूर्वी, २०१६ मध्येच आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही २०१९ मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपामध्ये काम करण्याचा अनुभव समाधानकारक आहे. मी भाजपामध्ये आनंदी आहे. एव्हढेच नाही, तर मी भाजपामध्येच राजकीय निवृत्ती घेणार आहे, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा, पिंपरी-चिंचवडकरांसाठी महेश लांडगेंचा ‘सर्वपक्षीय विकास अजेंडा’; विरोधी पक्षातील नगरसेवकांनाही साथ
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा आमदार पक्ष सोडतील, अशी चर्चा होती. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अद्याप एकाही आमदाराने पक्ष सोडण्याची “रिस्क” घेतली नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात कमालीचे मतभेद आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकजण भाजपामधून बाहेर पडेल, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळाला भाजपाच्या दोनपैकी एक आमदार गळाला लागेल, अशी चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी आमदार जगताप यांनी शेवटपर्यंत भाजपासोबत राहण्याचा निर्धार जाहीरपणे व्यक्त केला. त्यानंतर आता आमदार महेश लांडगे यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती ही भाजपामधूनच होईल, असा दावा केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार फुटतील किंवा महाविकास आघाडीला छुपी मदत करतील, याची शक्यता मावळली आहे.
हे पण वाचा, मराठी कलाकारांची उपासमार; देंवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमदार महेश लांडगे सरसावले
दरम्यान, त्यांनी कोरोना काळातील कार्य, राज्य सरकारकडून पिंपरी-चिंचवडकरांच्या अपेक्षा आणि राजकीय वाटचाल याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. नाशिक दुर्घटनेच्या एक दिवस आधी शहरातील ऑक्सिजन संपण्याची शक्यता होती. अशा रात्री दोनच्या सुमारास पुण्याकडे जाणारे २ ऑक्सिजन टॅँकर पिंपरी चिंचवडकडे वळवले. त्यामुळे मोठी जीवीत हानी टळली होती. अन्यथा नाशिक दुर्घटनेची पुरनावृत्ती झाली असती. मी भाजपचा एका सच्चा कार्यकर्ता म्हणून सदैव पिंपरी चिंचवड करांच्या हितासाठी लढत राहिल, शेवटही माझा भाजपमध्येच असेल असे आमदार महेश लांगडे यांनी सांगितले.
Read Also :
- देशात मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी होणार का? बाहेर आलं स्पष्टीकरण
- महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
- “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
- हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस