मुंबई : सध्या राजकारणात भेटीगाठींची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या हस्ते, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाच्या १०० खोल्यांचा ताबा टाटा रुग्णालयाकडे दिला होता. मात्र, शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबद्दलची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर, गृहनिर्माण विभागाच्या या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असून, या निर्णयावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली.
हे पण वाचा, आमची घरे तोडली.., आमच्या माणसांना पोलिस मारतायं.., आम्ही कुठे जायचं..- चिमुकला
दरम्यान, यांनतर यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने तोडगा काढला असून, बॉम्बे डाईंगमध्ये ही १०० घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यांनतर यावर पडदा पडेल, असं वाटत असतानाच, आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली असल्याची समजते आहे. या दोघांची ही भेट गुप्त होती. मात्र, आता या भेटीचे वृत्त बाहेर आले असून, ही भेट आता चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईला सत्ताधारी भाजपच जबाबदार; खासदार वंदना चव्हाण संतापल्या
तसेच, आव्हाड-फडणवीसांच्या या भेटीची कल्पना प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनाही नसल्याचं समजत असून, एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली आहे. या भेटीदरम्यान आव्हाड जवळपास २ तास नॉट रिचेबल होते. आव्हाडांनी घेतलेला निर्णय, मुख्यमंत्र्यांकडून फिरवला जाणार, याची कल्पना ज्या दिवशी मिळाली, त्याच दिवशी आव्हाडांनी फडणवीसांची भेट घेतली, अशी माहिती मिळत आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
विशेष म्हणजे, या भेटीच्या आधी आव्हाड यांनी आपली सरकारी गाडी, पोलिसांचा बंदोबस्त, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा सोडून, फडणवीसांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. तसेच, आव्हाडांसोबत यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील होते, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, दोघांच्या भेटीमागेच नेमकं कारण, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
Read Also :
- परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य
- बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!
- पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न