पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपची चिंचवड महापालिका येथे उद्योग सुविधा कक्ष आणि औद्योगिक उत्तरदायित्व कक्षाचं उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहारामध्ये गृह खात्याच्या वतीने 88 चौकांमध्ये 287 कॅमेरे बसवले आहेत. यावरून अजित पवारांनी तरूणांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर एकदमच हसु फुललं.
“निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत
शहरात गृह खात्याच्या मार्फेत 88 चौकांमध्ये 278 कॅमेरे आणि मनपाच्या वतीने 22000 कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे शहरात 7 हजार 600 कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठे जाता, दिवसा कुठे जाता, कुणासोबत फिरता, काय करता कुठं आणि कुणासोबत गुलगुलु करता, याचं सगळं कळणार आहे. सीसीटिव्ही च्या माध्यमातुन कुठल्या बहादराचं काय चाललंय, हे आता मला कळेल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. जो गुंडगिरी करत असेल, जो दहशत करत असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल. त्याचा आम्ही विचार करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?
आम्हाला कारण नसताना कुणाला त्रास द्यायचा नाही. आमच्या पोलीस यंत्रणेला इतरही बाकी भरपूर कामं आहेत. पण काहींच्या स्वभावाता बदलच होत नसेल तर आम्ही त्यावर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही. असंही ते म्हणाले. पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलीस पेट्रोलिंगसाठी स्मार्ट बाईक मोटारसायकल्स हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकासाठी ई-चलन उपकरणाचं वाटप, अग्निशमन दूचाकी वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचं पोलीस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता स्मार्ट मोटारसायकल्सचा वापर करण्यात येणार आहे.
“फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?
पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरूंद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर इत्यादी ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीनं व सहजपणे पोहोचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरण हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती, डिजिटल पेमेंट वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई, कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं महानगरपालिका परिसरातील विद्यार्थ्यांसाठीच्या रोईंग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देखील पार पडला.
Read also:
- “उद्या काय होणार , काय मिळणार? माझी चिंता करू नका”
- “वेळ संपलेली आहे, अंस म्हणण्यापेक्षा वेळ आता सुरू झाली”; राऊतांनी भाजपला ललकारलं
- राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
- “2014 च्या निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते”; रोहित पवार
- “2 जिल्हाचा पक्ष अन् स्वप्न पंतप्रधान होण्याची”; मनसेने शरद पवारांना पुन्हा डिवचलं