पिंपरी । विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दौरा केला. मात्र, यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह एकही स्थानिक पदाधिकारी सोबत नव्हते. खासदार कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद केला आणि निघाले. त्यामुळे डॉ. कोल्हे आणि स्थानिक नेत्यांमधील दूरावा वाढतो आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
डॉ. कोल्हे यांनी ‘शिवपूत्र संभाजी’ महानाट्याच्या निमित्ताने चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रकट मुलाखत दिली. त्यानंतर डॉ. कोल्हे महापालिका भवनात दाखल झाले. कोणताही पक्षीय लवाजमा सोबत नव्हता. दोन- तीन कार्यकर्त्यांसोबत डॉ. कोल्हे महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये दाखल झाल्यामुळे काहीकाळ अधिकाऱ्यांची धावाधाव झाली.
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा
काही दिवसांपूर्वी, हवेली बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. कोल्हे कुठेही सक्रीय दिसले नाहीत. बाजार समितींच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचा बोलबाला असताना हवेली बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा पराभव झाला. हा पराभव राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्याने त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये फारसे लक्ष घातला येत नाही. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोट बांधून भाजपाला आव्हान दिले पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या समर्थकांमधून व्यक्त होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे यांच्या विजयासाठी ज्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपा-शिवसेनेला अंगावर घेतले. त्यांच्यासाठी डॉ. कोल्हे आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीअंतर्गत अस्वस्थता आहे.
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”
स्थानिक पदाधिकारी- डॉ. कोल्हेंमध्ये दुरावा?
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात दोन-तीनदा डॉ. कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात दौरा केला. शहरातील काही विकासकामांचे भूमिपूजन केले. मात्र, महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर कोल्हे यांनी शहराकडे एकप्रकारे पाठ फिरवली. गेल्या ४ वर्षांच्या संसद सदस्यत्वाच्या काळात पिंपरी-चिंचवड शहरातील केंद्र सरकारशी संबंधित एकही महत्त्वपूर्ण विषय मार्गी लागला नाही. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी सलोख्याचे संबंध असतानाही पिंपरी-चिंचवड डॉ. कोल्हेंकडून दुर्लक्षित राहिले, अशी नाराजी आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधून बोलून दाखवली जाते. परिणामी, डॉ. कोल्हे यांच्या पत्रकार परिषद किंवा शहरातील कार्यक्रमांकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे पहायला मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…..महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल..! निकालानंतर काय होऊ शकतं, काय घडू शकतं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया