मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणुक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी विधानमंडळातील कार्यालयावर आपला ताबा घेतला. याआधी राज्यातील शिवसेनेच्या शाखा घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती. मात्र निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर आता जवळपास शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टींवर राजकीय लढाई सुरू झाली आहे.
हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वी बैठक बोलवली होती. या बैठकीत भरत गोगावले, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर यांनी बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन ताबा घेतला. यावेळी ठाकरे गटातील एकही आमदार नेते त्याठिकाणी उपस्थित नव्हते. मात्र यावेळी दोन्ही बाजूंनी कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत.
हेही वाचा..प्रचाराच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना करावी लागणार न्यायालयाची वारी
यावर सदा सरवणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणं ही लोकशाहीची खासियत आहे. तो त्यांचा हक्क आहे. त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण सत्याचा विजय झाला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे. पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी आम्ही विधानसभेच्या अध्यक्षकांकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार त्याचा ताबा आम्हाला देण्यात आला. असं भरत गोगवले यांनी म्हटलं आहे.
Read also
- “एकनाथ शिंदेंनी आता त्यांचा ‘बाप’ ही बदलला, त्यांचा नाव बाप अमित शहा “
- हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात
- हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “
- हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा
- हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”