पुणे : राज्य सरकारने २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यांनतर, मुंबईच्या स्थानिक प्रशासनानेही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. पण, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईसाठी वेगळे नियम आणि पुण्यासाठी वेगळे नियम का? असा वाद पुण्यात निर्माण झाला. यांनतर निर्बंध शिथील करण्यात यावेत यासाठी शहरातील दुकानदार-व्यावसायिक, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले. त्यांनी, निर्बंधांच्या विरोधात रात्री आठपर्यंत दुकानं सुरू ठेवून निषेध व्यक्त केला.
तसेच, पुणे महापौरांनी या संदर्भात पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करून, ५ टक्क्यांपेक्षाही खाली पॉझिटिव्हिटी रेट असल्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्यात यावी, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार केली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी, “निर्बंधांतून शिथिलता हवी असेल, तर महापालिकेकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा”, असं सांगितलं. त्यावर महापौरांनी संताप व्यक्त करत अखेर पत्र पाठवले आणि शहरातील निर्बंध शिथिल करून, व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी केली.
मोठी बातमी! उद्यापासून पुणे अनलॉक, दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमांनंतर आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी, शहरातील कोरोना आढावा बैठकीत पुणे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी, महापौर, पालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी ही आढावा बैठक घेतली. पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील, हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा पर्यंत सुरु राहतील, अशी महत्त्वाची माहिती आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?
यावेळी त्यांनी, “आता जर कुणी पुण्याच्याबाबत काही विचारलं तर, तर सरळ सांगा पालकमंत्री म्हणून मी निर्णय घेतला. काहीही ठरवताना मी मुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घेत असतो’ असं म्हणत अप्रत्यक्षपणे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना सल्ला दिला. तसेच, “जिथे गर्दी जमते तिथे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांनी असं करायला नको होतं. त्यांना माहिती आहे, आम्हाला निर्णय घेण्यात अजिबात हौस नाही, पण लोकांचे जीव महत्वाचे आहेत”, असं स्पष्टीकरण दिलं.
काय आहेत पुण्यातील नवीन निर्बंध…
- पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
- हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार.
- पुण्यात सोमवारपासून मॉल सुरु. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश. मॉल रात्री ८ पर्यंत सुरु राहणार.
- मॉल, हॉटेल आणि जलतरण तलाव यासाठी नवी नियमावली लागू केली जाणार.
- पुणे ग्रामीण लेवल 3 वर असल्याने ग्रामीण भागात ४ वाजेपर्यंतच परवानगी.
- निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी पॉझिटिव्हिटी रेट ७ % झाल्यास पुन्हा कडक निर्बध लावण्यात येणार.
- हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक
- पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार
- जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी
- पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक
Read Also :
- राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, आठवड्याभरापासून आहेत उपचार सुरु
- प्रदेशाध्यक्ष बदलीवरून चंद्रकांत पाटील म्हणतात, “भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार पण…”
- लवकरच येईन! महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंचा महाविकास आघाडीला इशारा
- भाजपत अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने गाठले टोक, शहर भाजपची टीम दिल्ली दरबारी दाखल
- शिवसेना पर्वती मतदार संघाच्या आंदोलनाला अखेर यश; जनता वसाहत मधील लसीकरणाला येणार वेग