नाशिक : राज्यातील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापली पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने जोमाने कामाला लागले आहेत. राज्यातील प्रमुख पक्षातील महत्त्वाचे नेते मोर्चेबांधणीसाठी राज्यभर दौरे करत आहेत. एकीकडे असे चित्र असताना, दुसरीकडे पक्षांतर्गत कुरबुरींनीही आपले तोंड बाहेर काढल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना पर्वती मतदार संघाच्या आंदोलनाला अखेर यश; जनता वसाहत मधील लसीकरणाला येणार वेग
नाशिक शहरातील सत्ताधारी भाजपत, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने टोक गाठले असून, यावर ‘मधला मार्ग’ काढण्यासाठी आणि दुसरीकडे शहर विकासासाठी नाशिक भाजपचे नेते आता थेट दिल्ली दरबारी गेले आहेत. दिल्लीत आधी नाशिक मधल्या अडकून पडलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा जाणार आहे आणि मग आगामी निवडणुकांची रणनीतीवर मंथन केले जाणार आहे.
“पुण्याचा विकास फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार”, चाकणकरांचा टोला
काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक मध्ये होते. यावेळी त्यांनी नाशिक भाजप मधील कुरबुरी समजून घेतल्या असून, त्यावर चर्चा करण्यासाठी आता नाशिक भाजपमधील नेत्यांना दिल्लीत बोलवले गेले आहे. सध्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे पहिल्या फळीतले इतर नेतेही दिल्लीतच आहेत. इथे नाशिक आणि इतर महापालिकांच्या निवडणुकांवरही चर्चा होत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, हिमगौरी आडके, माजी गटनेते जगदीश पाटील यांच्यासह महापालिकेचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता संजय घुगे यांचा या टीममध्ये समावेश आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांची ते भेट घेणार आहेत.
Read Also :
- “ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका
- मिसेस फडणवीसानंतर आता मिस्टर फडणवीस; पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी मोदींच्या नावाची कुरघोडी?
- शिवसेनेच्या मुखपत्रातून फोडला गेला राजकीय बॉम्ब, अजून एका ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाचे संकेत?
- २०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
- भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस