पुणे : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील ११ जिल्ह्यांतील निर्बंध लेव्हल ३ वर, तर एकूण २५ जिल्ह्यांना निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आहे. पुण्यातील संसर्ग देखील गेल्या काही महिन्यांपासून कमी असून, रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे.
“चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
मात्र, काही दिवसांपासून पुण्यातील लसीकरण केंद्रावर लसींचा पुरवठा होत नसल्याने, विविध ठिकाणचे लसीकरण ठप्प आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी करण्यात देखील मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. दरम्यान, याचा फटका पुण्यातील जनता वसाहत प्रभाग क्र. ३० ला बसला असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातावर पोट असणाऱ्या, घरकाम करणाऱ्या माता-भगिनी, बिगारी-गवंडीची संख्या आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
या पार्श्वभूमीवर, पर्वती मतदारसंघाचे शिवसेना विभाग प्रमुख सूरज लोखंडे यांनी, पुणे महागरपालिका आयुक्त मा. विक्रम कुमार यांना जनता वसाहत मधील लसीकरण वाढवण्या संदर्भात चर्चा व निवेदन दिले होते. एकीकडे स्तर ३ मध्ये पुणे असल्याने या जनतेला कामावर जाण्यासाठी लस घेणे बंधनकारक आहे. लसीकरणाशिवाय मालक मंडळी त्यांना कामावर येऊ देत नाहीयेत. त्यामुळे या कष्टकरी मंडळींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
२०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
त्यामुळे, या भागातील लसीकरण वाढवावे, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी आणि लसीकरण ऑनलाईन पेक्षा प्रत्यक्षात येऊन करण्यात यावे, अशी विनंती या निवेदन पत्रात दिली होती. दरम्यान, यासंदर्भातील केलेल्या आंदोलनाला आणि मागणीला अखेर यश मिळाले असून, महापालिका आयुक्तांकडून लवकरच जनता वसाहत मधील लसीकरण वाढववण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच लसीकरणाला वेग मिळणार असून, येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Read Also :
- “पुण्याचा विकास फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार”, चाकणकरांचा टोला
- कॉलेजनंतर आता हॉटेलवर ईडीची छापेमारी, समन्स बजावूनही गैरहजर राहत असल्याने कारवाई केली जात असल्याची चर्चा
- “ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका
- मिसेस फडणवीसानंतर आता मिस्टर फडणवीस; पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी मोदींच्या नावाची कुरघोडी?
- शिवसेनेच्या मुखपत्रातून फोडला गेला राजकीय बॉम्ब, अजून एका ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाचे संकेत?