मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वा. राज्यातील जनतेशी दूर दृश्य प्रणालीद्वारे पुन्हा एकदा संवाद साधणार असून, आजच्या संवादात राज्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण, लोकल प्रवास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यात बाधित रुग्णसंख्या कमी होत असली, तरी धोका टळलेला नाही, असे त्यांनी याआधीच सांगितले आहे. त्यामुळे आता निर्बंधात वाढ होणार की ते आणखी शिथिल केले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मोठी बातमी! उद्यापासून पुणे अनलॉक, दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु
सध्या मुंबईत लोकलचा प्रवास करायला सर्वसामान्य नागरिकांना बंदी आहे, ती पुढील काळातही कायम राहणार का?, की लसीचे २ डोस घेतलेल्यांना प्रवासाची परवानगी मिळणार?, उपाहारगृहांना परवानगी मिळणार का?, याबाबत सरकार कोणता निर्णय घेतंय याकडे जनतेचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मुंबई, ठाण्यासह २५ जिल्ह्यांमधील निर्बंध काही प्रमाणात, तर ११ जिल्ह्यांतील निर्बंध लेव्हल ३ मध्ये ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या’ महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेना पत्र
दुसरीकडे, लसीचे २ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी नागरिकांकडून, तसेच भाजपसह अन्य विरोधी पक्ष आणि रेल्वे प्रवासी संघटनांकडून होत आहे. यासाठी आत्तापर्यंत ठिकठिकाणी अनेकवेळा आंदोलनही करण्यात येत आहे. व्यापारी वर्गाकडूनही शिथिलता देण्याची मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री जनतेशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध
पुण्यातील कोरोना निर्बंधांवरून राज्य सरकार आणि पुणे महापौर पुन्हा एकदा आमनेसामने
- सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
- रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी ४ वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
- उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
- सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
- खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
- कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
- क्रीडा- सकाळी ५ वा.पासून सकाळी ९ वा./ सायं ६ वा. पासून सायं.९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
- चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
- सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
- अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
- बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
- बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
- कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.
- ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
- जमावबंदी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.
- व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
- सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
- मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
- खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
- उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.
मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान
उत्पादनाच्या अनुषंगाने…
प्रदेशाध्यक्ष बदलीवरून चंद्रकांत पाटील म्हणतात, “भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार पण…”
- अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
- सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
- राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
- अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील
मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई
२२ जिल्ह्यांत काय आहेत निर्बंध…
“चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
- सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.
- सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी
- सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
- कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी
- जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी
- जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद
- सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार
- शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार
- सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना
- नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.
- रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.
- वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी
- राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.
“थोडी कळ सोसा लवकरच शिथिलता देऊ”, वडेट्टीवारांचे पुणेकरांना आवाहन
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी, शहरातील कोरोना आढावा बैठकीत पुणे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी, महापौर, पालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी ही आढावा बैठक घेतली. पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील, हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा पर्यंत सुरु राहतील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
चंद्रकांत पाटील यांची घोषणा, निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा
Read Also :
- अखेर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर, पुणेकरांना दिलासा नाहीच
- भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?
- राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, आठवड्याभरापासून आहेत उपचार सुरु
- “ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका
- लवकरच येईन! महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंचा महाविकास आघाडीला इशारा