मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय पुन्हा एकदा हाती घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला आला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे मशिदीवरील भूमिका कळवली असून त्यांनी यासंदर्भात पत्र घरोघरी पत्रक वाटण्यास कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत.
राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणून माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
त्याचबरोबर तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असा सज्जड दम देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
“संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
दरम्यान, राज ठाकरे यांनी मागील काही राजकीय सभामधून मशिदीवरील भोंग्यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर राज्यात मनसेकडून आंदोलने देखील करण्यात आले. तसेच आज कार्यकर्त्यांना दिलेल्या सुचनांनतर पुन्हा एकदा ते प्रकरण राज्याच्या राजकीय वर्तुळात येण्याची शक्यता आहे.
Read also:
- “साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल”; गृहमंत्री
- “छगन भुजबळ OBC आरक्षणावरून तोंडघशी पडतील; आघाडीच्या एका गटाला आरक्षण नकोय”
- भाजपचा ‘जल आक्रोश’ अखेर मुख्यमंत्र्यांनी ऐकला, औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटणार..
- “राज्यसभेच्या निवडणुकीसारखं, विधान परिषदेच्या निवडणुकीतही ‘भाजप’ आघाडीला रडवणार”
- भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार