मुंबई : केंद्र तसेच राज्य सरकारच्या माहितीनुसार जवळपास ९५ टक्के केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाया या विरोधी पक्षातील नेत्यांवर झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून युवकांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेतले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बारामती अॅग्रो कंपनीबाबत आज रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. त्याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत ईडीच्या कार्यालयाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
हेही वाचा…रामलल्लाच्या मिरवणूकीवर दगडफेक, मग थेट बुलडोझर कारवाई, मीरा रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
सत्यमेव जयते . सत्याचा विजय होईलच. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्यामुळे आव्हाने ही येतच राहतील. पण त्यावर मात करत संघर्ष करू, आणि सत्याच्याच मार्गाने चालू हा विचार कैलासवासी यशवंतराव साहेबांचा वारसा आहे. तो पुढे नेण्याचं काम शरद पवार साहेबांनी गेली ६ दशके केलं आहे आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान लढण्यासाठी आमची लढाई असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
हेही वाचा…मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ? प्रकरण काय ?
आमच्या लढाईत दुर्दैवाने अनेक यंत्रणांचा गैरवापर केला जातो. पार्लमेंटचा डेटा असं सांगतो की, ९० ते ९५ टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत. ज्या इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या आहेत. त्या अतिशय स्वायस्त संस्था होत्या. असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काही आश्चर्याची गोष्ट नाही. त्याने एक मोठी संघर्ष यात्रा काढली. तो आज महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडीत, युवक आणि नवीन पिढीसाठी काही करू पाहतो. त्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबक्या आवाजांनी ऐकू येते की कदाचित हे सुडाचे राजकारण असू शकते. अशी प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळे यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवार इडीच्या चौकशीला आले, आता रवींद्र वायकर कधी येणार?” भाजपचा तिखट सवाल
हेही वाचा…लोकसभेपुर्वी इंडिया आघाडीत मोठी फुट , ममता बॅनर्जींनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…नदीपात्रात बोट उलटली, ६ महिला बुडाल्या, नदीकाठवरच नातेवाईकांचा आक्रोश
हेही वाचा…“ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेल्या उंदरांना लवकरच बाहेर काढू”, ठाकरे गटाने दिला इशारा
हेही वाचा…“रोहित पवारांवर सुडाची कारवाई, शेवटपर्यंत लढत राहू,” सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल