मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहुर्त लागला आहे. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपकडून जेष्ठ नेत्यांना संधी दिली आहे. यामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगुंटीवार, गिरीश महाजन या ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटलांना वरच्या क्रमांकाचे स्थान आहे.
औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी मुंबईतील परळी येथील जमनादास प्रभुगास चाळ येथे झाला. दादर मध्ये शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षणा पुर्ण केले. 1985 मध्ये फोर्टामधील सिद्धार्थ कॉलेजमधुन पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी ओळख झाली. 1980 मध्ये त्यांनी एबीव्हीपीसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणुन काम केले आहे.
“इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता
1982 मध्ये त्यांची प्रदेश मंत्री म्हणून नियुक्ती झाली. 1985 मध्ये पाटील यांची एबीव्हीपीचे क्षेत्रात संघटन मंत्री मंहणून निवड झाली. जिथे त्यांनी तरूणांच्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्यावर लक्ष केंद्रित केले. 1990 मध्ये पाटील एबीव्हीपीचे अखिल भारतीय मंत्री म्हणून निवडून आले. यावेळी त्यांनी भारतातील विविध जिल्ह्यांमधील लोकांच्या सामाजिक समस्यांची जाणीव करून दिली. 2004 मध्ये ते भारतीय जनता पार्टीत सामील झाले आणि 2013 मध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
“मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
2014 मध्ये त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोंबर 2014 मध्ये त्यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री म्हणुन निवड झाली. जुलै 2016 पासुन ते कॅबिनेट मंत्री पदावर होते. महसूल, मदत आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हाताळत आहेत. 2019 ला चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड मतदार संघातुन आमदार म्हणुन निवडून आले.2019 ला चंद्रकांत पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत. 12 नोव्हेबर 2019 पर्यंत ते महाराष्ट्र राज्यातील महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सार्वजनिक उपक्रम वगळता कॅबिनेट मंत्री होत तसेच कोल्हापुर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन काम पाहिले आहे.
Read also
- “ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
- “योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”
- मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
- TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
- एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री