पुणे : आगामी काही काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर येणाऱ्या सर्व निवडणुका सगळ्यांसाठी प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. यातच पुण्यात आता भाजप शहाराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये कसबा विधानसभा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला. याचा मोठा धक्का भाजपच्या नेत्यांना बसला आहे. यावरून आता महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन भाजप वेगळी रणनीती आखण्याच्या तयारीत आहे. याचाच परिणाम म्हणून भाजप शहाराध्यपदी येत्या आठवड्यात नवीन चेहरा निवडला जाण्याची शक्यता आहे.
पुणे भाजपचे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मुदत मागेच संपली आहे. त्यामुळे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे आता शहराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीत ते अडकणार असल्याने माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, कसब्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्याने आता महाविकास आघाडी जोरदार तयारीत आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त केला. याचा परिणाम पुणे महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप आता पक्षांतर्गत हालचाली करतांना दिसत आहे.
Read also
- हेही वाचा….शिवसेना अन् धनुष्यबाणासंदर्भात निवडणुक आयोगाचं कोर्टाला पत्र, उद्धव ठाकरेंच्या टिकेवर उत्तर
- हेही वाचा….“सत्ता उंबरठ्यावर यायला लागली, मग ममता, समता, जयललिता, या सगळ्यांना बोलवण्यात आलं”, ठाकरेंचा भाजपला टोला
- हेही वाचा….“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं
- हेही वाचा….जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय
- हेही वाचा….“शीतल म्हात्रे बहिणीसमान, मला आणि माझ्या कुटुंबीयाला प्रचंड मानसिक त्रास झाला,” सुर्वेंची प्रतिक्रिया