पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रात सत्तांतरण झालं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर ५० खोक्यांचा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. यातच आता यावरून राम मुंगासे या तरूणाने ५० खोके एकदम ओके असं म्हणत एक रॅप तयार केलं आहे. त्यानंतर राम मुंगासेला पोलिसांनी अटक केली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावला”, दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरे भावूक
राम मुंगासे याला अटक केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…रोशनी शिंदेंचा आनंद दिघे होण्याची भीती, ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? माजी महापौरांचा ठाकरेंवर गंभीर आरोप
दरम्यान, यावरून आमदार रोहित पवार यांनी देखील राज्य सरकारवर टिका केली आहे. ते म्हणाले की, आपल्या रॅप साॅंग मध्ये कुणाच्याही नावाचाही उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरूण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकराचा कबुलीजबाबच नाही का ? असा खोचक सवाल रोहित पवारांनी केला आहे. शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा हा धोकादायक कारभार आहे. असंही रोहित पवारांनी म्हटलंय.
आपल्या #रॅप_साँग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही #राम_मुंगासे या तरुण कलाकाराला #५०_खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का?
शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा…— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2023
राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50… pic.twitter.com/9IOz4XUZ5X
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 6, 2023
Read also
हेही वाचा…“पवार साहेबांनी जेव्हा कृषी विभागाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा देशाला निर्यातीची दारं खुली केली”
हेही वाचा…“कृपया मी जी चिंता करतो, ती गांभीर्याने घ्या,” शरद पवारांचं थेट केंद्र सरकारला “त्याबाबत” पत्र
हेही वाचा..रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोग पोलिसांच्या अहवालावर असमाधानी
हेही वाचा…“माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर टिका झाली, परंतु फडणवीस यामुळे व्यथीत होणार नाहीत”, पंकजा मुंडे
हेही वाचा…रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन महिला खासदार भिडल्या, थेट गृहमंत्र्यांची घेतली भेट