मुंबई : मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात चाललेल्या टिका टिप्पणी आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील भाष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टिका करतांना त्यांचा उल्लेख फडतूस म्हणून केला. त्यावर अशा टिका टिप्पणीवर फडणवीस व्यथीत होणार नाहीत. राजकारण हे काटेरी सिंहासन आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्याठिकाणी हनुमान चालिसाचं पठण होईल”, नवनीत राणा
राजकारणात आलो म्हणजे अनेक टिकांना सामोरं जावं लागतं. अनेकदा मला दारूवाली बाई म्हणून माझ्यावर टिका झाली. जेव्हा माझ्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झालेत. तेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर टिका झाली. माझे रेल्वे स्टेशनवर फोटो लावून, पाकिटं वाटून माझा अपमान करण्यात आला. राजकारण हा काटेरी रस्ता आहे. इथं फक्त तुम्हाला फुलंच वाटायला येणार नाहीत. याठिकाणी तुम्हाला काटेही आडवे येतील. तुमच्यावर टिका टिप्पणीही होईल. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा…“फडणवीसांचा उल्लेख “फडतूस”, शिंंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ”
मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या टिकेमुळे देवेंद्र फडणवीस व्यथीत होणार नाहीत. त्यांचे कामं ते व्यवस्थित करतील. तसेच ह्या गोष्टी राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे कुणीही असं करू नये. परंतु ह्या गोष्टी होत राहणार असंही त्या म्हणाल्या.
Read also
हेही वाचा…रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन महिला खासदार भिडल्या, थेट गृहमंत्र्यांची घेतली भेट
हेही वाचा…“सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावला”, दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरे भावूक
हेही वाचा…रोशनी शिंदेंचा आनंद दिघे होण्याची भीती, ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? माजी महापौरांचा ठाकरेंवर गंभीर आरोप
हेही वाचा..“सुषमा अंधारे अन् राखी सावंत बहिणी-बहिणी, सनसनाटी पसरवणाऱ्यामध्ये त्यांच्यात स्पर्धा,” भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
हेही वाचा…“प्रत्येक जीव फेसबुक लाईव्हमुळे वाचला, त्यामुळे आपले उद्धव साहेब ‘कुटूंब प्रमुख’ झाले”, आदित्य ठाकरे