ठाणे : शिवसेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांच्या मारहाणीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने ठाण्यात राज्य सरकारच्या विरोधात महामोर्चा काढला आहे. या महामोर्चात शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, सुषमा अंधारे, विनायक राऊतांचा समावेश आहे. या वेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपला आवाहन दिलं आहे.
हेही वाचा…“नौंटकी करणाऱ्यांसोबत आम्ही युती करणार नाही,” राजू शेट्टींनी नेमकं कुणाला सुनावलं
पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर येत लढावं. मी एकटा तुमच्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे, माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आहे. सामने आओ तुम्हे तुम्हारा नाम भूला देंगे. असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. तसेच आम्हाला निवडून द्या, तुम्हाला छळमुक्त करणार, असं आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील नागरिकांना दिलं.
हेही वाचा…‘स्वरदा बापट’ की ‘ मुरलीधर मोहोळ’, पुणे लोकसभेला ‘कुणाला’ उमेदवारी ?
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही कडाडून प्रहार केला. चोरांचा पक्ष नसतो, टोळी असते. मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या. फक्त एक पोस्टसाठी असं म्हणत राज्यात सध्या मोगलाई सूरू असल्याची टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच हे सरकार काही तासांपुरतं असून लवकरच कोसळणार असल्याचं सुचक विधानही त्यांनी केलं.
हेही वाचा…या दशकातला सगळ्यात मोठा विनोद, ‘घराबाहेर पडू देणार नाही’, सुषमा अंधारेंनी बावनकुळेंची सगळीच काढली
दरम्यान, यावेळी ठाणे आयुक्तयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यातच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली.
Read also
हेही वाचा…सभा ठाण्यात, अंधारेंनी धूर काढला पुण्यात ! भाजप नेत्याचा डान्सबारमधला विषय चव्हाट्यावर
हेही वाचा…“भाजपचा मस्तवाल बावनकुळेंनी लक्षात ठेवावं, ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचाय”
हेही वाचा…“ते मला फडतूस, लाचार टरबूज्या, छोटा भीम …”, राष्ट्रवादीची फडणवीसांवर जहरी टिका
हेही वाचा…“सामना वर्तमान पत्र लवकरच बंद होणार”? केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा…“सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”