मुंबई : शिवसेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांच्या मारहाणीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने ठाण्यात राज्य सरकारच्या विरोधात महामोर्चा काढला आहे. या महामोर्चात शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, सुषमा अंधारे, विनायक राऊतांचा समावेश आहे. या वेळी सुषमा अंधारे यांनी ठाण्यातून पुण्यातील भजापच्या नेत्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…‘स्वरदा बापट’ की ‘ मुरलीधर मोहोळ’, पुणे लोकसभेला ‘कुणाला’ उमेदवारी ?
सुषमा अंधारे यांनी भाजपचे माजी गटनेता राहिलेले गणेश बीडकर यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, भाजपचा गटनेता गणेश बीडकर यांचे डान्स बार मधले काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर मला काही व्हाईस काॅलवर खंडणी मागण्यात आली. त्यांच्या ऐकूव माहितीवर पोलिसांनी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राजे हो. तुमच्या पगार आमच्या करातून कपात होतात. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी पोलिसांसोबत गणेश बीडकरांवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…या दशकातला सगळ्यात मोठा विनोद, ‘घराबाहेर पडू देणार नाही’, सुषमा अंधारेंनी बावनकुळेंची सगळीच काढली
आम्ही जेव्हा लाईट बीज, नळपट्टी, भरतो त्यात तुमचा पगार होतो. त्यानंतर आमची बाजू ऐकायची सोडून आमच्यावरच गुन्हे दाखल करतात. असा खोचक टोलाही त्यांनी पोलिसांना लगावला. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंसोबत देवेंद्र फडणवीसांचा देखील चांगलाच समाचार घेतला. यातच आता सुषमा अंधारे यांच्या टिकेवर भाजप काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं आहे. ?
सभा ठाण्यात, अंधारेंनी धूर काढला पुण्यात ! भाजप नेत्याचा डान्सबारमधला विषय चव्हाट्यावर https://t.co/BuTdZLWPoX pic.twitter.com/mwnRsYgQwu
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) April 5, 2023
Read also
हेही वाचा…“भाजपचा मस्तवाल बावनकुळेंनी लक्षात ठेवावं, ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचाय”
हेही वाचा…“ते मला फडतूस, लाचार टरबूज्या, छोटा भीम …”, राष्ट्रवादीची फडणवीसांवर जहरी टिका
हेही वाचा…“सामना वर्तमान पत्र लवकरच बंद होणार”? केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा…“सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”
हेही वाचा…“नौंटकी करणाऱ्यांसोबत आम्ही युती करणार नाही,” राजू शेट्टींनी नेमकं कुणाला सुनावलं