मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस शब्द वापरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी खोचक टोला हाणला आहे. तर राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी देखील यावर भाष्य केलंय.
हेही वाचा…“30 लाख दे, नाहीतर गोळ्या घालून ठार करू,” काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी
दिल्ली. उन्होंने मुझे नीच, मौत का सौदागर, गंधी नाली का कीड़ा कहा. महाराष्ट्र ते मला फडतूस, लाचार टरबूज्या, छोटा भीम म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत हे रडगाणे चालू होईल. असा शाब्दिक टोला सुरज चव्हाण यांनी हाणला आहे.
हेही वाचा…“तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर..”, सुषमा अंधारे फडणवीसांवर काय बोलून गेली ?
उद्धव ठाकरे आणखी बोलले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यावर शिवसेनेला धमक्या देऊ नका. तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. ती फक्त इडी आणि सीबीआय असल्याने. पण सत्ता असेपर्यंतच बोलू शकाल. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही तुमची सत्ता नसेल. तोपर्यंत यांच्यासारखे पोपट मिठू मिठू बोलतीय. तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. असं संजय राऊतांनी म्हटलंय.
हेही वाचा…“तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय,” संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट २०१९ च्या निवडणुकीत का कापलं. यावरून संजय राऊत यांनी मोठा दावा केला. तुम्ही मोठा भ्रष्टाचार केला. दिल्लीपर्यंत प्रकरण गेलं होतं. त्यामुळे घराबाहेर पडू दिलं नाही. तुम्हाला आणि तुमच्या पत्नीलाही तिकीट दिलं नाही. तुम्ही त्यावर आधी खुलासा करा. तुम्ही काय लुट केली होती, वीज खात्यात हे आम्ही बोलायला गेलो तर तुमचं कठीण होईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिल्ली
उन्होंने मुझे नीच,मौत का सौदागर,गंधी नाली का कीड़ा कहा …महाराष्ट्र
ते मला फडतूस,लाचार,लाळघोटा,टरबूज्या,छोटा भीम म्हणाले.
येणाऱ्या निवडणुकीत हे रडगाणे चालू होईल.— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) April 5, 2023
Read also
हेही वाचा…“सामना वर्तमान पत्र लवकरच बंद होणार”? केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा…“सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”
हेही वाचा…“नौंटकी करणाऱ्यांसोबत आम्ही युती करणार नाही,” राजू शेट्टींनी नेमकं कुणाला सुनावलं
हेही वाचा…‘स्वरदा बापट’ की ‘ मुरलीधर मोहोळ’, पुणे लोकसभेला ‘कुणाला’ उमेदवारी ?
हेही वाचा…या दशकातला सगळ्यात मोठा विनोद, ‘घराबाहेर पडू देणार नाही’, सुषमा अंधारेंनी बावनकुळेंची सगळीच काढली