पुणे : खासदार गिरीश बापट यांचं आठवडाभरापूर्वी निधन झालं. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकांना आणखीन एक वर्षांचा कालावधी आहे. सत्ताधारी भाजपकडून पुण्यात कोणाला उमेदवारी दिली जाणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“शिवसेनाप्रमाणे काॅंग्रेसमध्येही तोच शिरस्ता,” राहुल गांधी आम्हाला वेळ देत नाही, काॅंग्रेसच्या नेत्यांची खंत
खासदार गिरीश बापट यांची इच्छाशक्ती प्रबळ होती, त्यामुळे ते आताही आजारातून बाहेर पडतील, असं वाटत होत. मात्र दुर्दैवाने त्याचं निधन झालं. या धक्यातून अजून आम्ही बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची यावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
दरम्यान, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून लागलेल्या फ्लेक्सवरही पाटील यांनी भाष्य केलं. “भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याची योजना पुणे शहरात विरोधकांनी केली आहे. तो फ्लेक्स देखील त्यांनीच लावला होता. मुळीक हे बापटांचे शिष्य असल्याने ते असं कधीचं लावणारं नाहीत. असेही पाटील म्हणाले.
पुणे लोकसभेसाठी या नावांची चर्चा
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचे नाव पुणे लोकसभेसाठी आघाडीवर आहे. बापट यांच्या घरातीलच उमेदवार दिल्यास पक्षांतर्गत नाराजी टाळता येऊ शकते. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता देखील वाढत असल्याचं काही भाजप नेत्यांचं मत आहे.
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
दरम्यान, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खा संजय काकडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावे देखील उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. बापट यांच्या निधानानंतर भावी खासदार म्हणून मुळीक यांचे पोस्टर्स झळकल्याने मोठी टीका झाली होती. त्यामुळे आता भाजप नेमक कोणाला उमेदवारी देणार याकडे? सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also
हेही वाचा…या दशकातला सगळ्यात मोठा विनोद, ‘घराबाहेर पडू देणार नाही’, सुषमा अंधारेंनी बावनकुळेंची सगळीच काढली
हेही वाचा…“30 लाख दे, नाहीतर गोळ्या घालून ठार करू,” काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…“तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर..”, सुषमा अंधारे फडणवीसांवर काय बोलून गेली ?
हेही वाचा…“तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय,” संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा
हेही वाचा…“..त्यामुळे मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो,” नितीन गडकरींचं राहुल गांधीबाबत मोठं विधान