ठाणे : शिवसेनेच्या युवा सेनेच्या सचिव अॅड.दुर्गा भोसले शिंदे यांचं काल ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. महाविकास आघाडीने काढलेल्या आक्रोश मोर्चात अॅड. दुर्गा भोसले शिंदे यांनी जोरदार घोषणाबाजी करत असतांना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे बुधवारी रात्री ह्यदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दुख व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…“डोक्यात खोक्याचा विचार असल्याने त्यांची तशी मानसिकता झालीय”, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दुर्गा भोसले शिंदे यांच्या निधनावंर दुख व्यक्त केलं आहे. काल आम्ही आमचा सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावला. दुर्गा भोसले-शिंदे जी आपल्यात नाहीत. यावर विश्वास ठेवणे अतिशय कठिण आणि दु: खद आहे. एक युवासैनिक आणि मित्र म्हणून त्यांचे जाणे माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करणे, शक्यच नाही. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं
काल रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात दुर्गा भोसले शिंदे ह्या कार्यकर्त्यांसमवेत मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी मोर्चात घोषणाबाजी करीत असतांना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी मुंबईला पाठवले होते.
काल आम्ही आमचा सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावली. दुर्गा भोसले-शिंदे जी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे अतिशय कठीण आणि दुःखद आहे.
एक युवासैनिक आणि मित्र म्हणून त्यांचे जाणे माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करणे, शक्यच नाही.
ॐ शांती! pic.twitter.com/Uvuc5SyEPs
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 6, 2023
Read also
हेही वाचा…रोशनी शिंदेंचा आनंद दिघे होण्याची भीती, ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? माजी महापौरांचा ठाकरेंवर गंभीर आरोप
हेही वाचा..“सुषमा अंधारे अन् राखी सावंत बहिणी-बहिणी, सनसनाटी पसरवणाऱ्यामध्ये त्यांच्यात स्पर्धा,” भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
हेही वाचा…“प्रत्येक जीव फेसबुक लाईव्हमुळे वाचला, त्यामुळे आपले उद्धव साहेब ‘कुटूंब प्रमुख’ झाले”, आदित्य ठाकरे
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्याठिकाणी हनुमान चालिसाचं पठण होईल”, नवनीत राणा
हेही वाचा…“फडणवीसांचा उल्लेख “फडतूस”, शिंंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ”