पुणे : सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपकडून राज्यात वीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच काल शिवडी येथे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वीर सावरकर गौरव यात्रेत सहभाग घेतला. यावेळी चित्रा वाघ यांनी काॅंग्रेसवर जोरदार टिका केली. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“ते मला फडतूस, लाचार टरबूज्या, छोटा भीम …”, राष्ट्रवादीची फडणवीसांवर जहरी टिका
चित्रा वाघ यांनी वीर सावरकर गौरव यात्रेतील काही फोटो ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं की, आम्ही सारे सावरकर, मी पण सावरकर. चहू बाजूंनी इंग्रजांचा थरकाप उडविणारे आणि स्वातंत्र्य लक्ष्मीचे पुजिते स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांच्या शिवडी विधानसभेतील गौरव यात्रेत सहभागी झाले. सावरकर एकच आहेत… एकच होते…आणि एकच राहतील! राहुल गांधीच काय तर अख्या काँग्रेस खानदानात सावरकर होण्याची कोणाची लायकी नाहीये ! ही फक्त एक यात्रा नाही तर सावरकरांचा अपमान करणाऱ्या विरोधात जनतेचा रोष आहे! …आणि जेव्हा जेव्हा सावरकरांचा अपमान करण्याची कोणी हिम्मत करेल तेव्हा तेव्हा आम्ही त्याला असंच ठेचू! असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…“सामना वर्तमान पत्र लवकरच बंद होणार”? केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
त्यावर अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. वाह ताई.. वाह.. ज्यांच्या पुण्याईवर इतका आकांड तांडाव करताय ना. त्या सावित्रीमाईंबद्दल तुमचे महामहीम कामा कोश्यारी बरळला. तेव्हा चकार शब्दही काढला नाही. निदान आडनाव तरी सार्थकी लावा. जनता लक्षच ठेऊन आहे. योग्य वेळ येऊ द्या. तुमच्या पक्षाची लायकी जनताच दाखवेल. असा इशाराही त्यांनी दिला.
वाह ताई वाह… ज्यांच्या पुण्याईवर इतका आकांड तांडाव करताय ना त्या सावित्रीमाइंबद्दल तुमचे महामहीम काका “कोश्यारी” बरळला तेंव्हा चकार शब्दही काढला नाही आपण! निदान आडनाव तरी सार्थकी लावा. जनता लक्षच ठेऊन आहे ताई, योग्य वेळ येऊ द्या तुमच्या पक्षाची लायकी जनताच दाखवेल. https://t.co/TKXr9PoumT
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 5, 2023
Read also
हेही वाचा…भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या
हेही वाचा…“सततचा पाऊस ही राज्य सरकारकडून आता नैसर्गित आपत्ती घोषित”, राज्य सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…“माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, सामने आओ..! तुम्हे तुम्हारा नाम भूला देंगे” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं ओपन चॅलेंज
हेही वाचा…सभा ठाण्यात, अंधारेंनी धूर काढला पुण्यात ! भाजप नेत्याचा डान्सबारमधला विषय चव्हाट्यावर
हेही वाचा…“भाजपचा मस्तवाल बावनकुळेंनी लक्षात ठेवावं, ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचाय”