मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमनेसामने येत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख फडसूत केल्याने मोठा वाद निर्माण झाला. त्यावर सत्ता गेल्याने महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले असल्याची टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“भाजपचा मस्तवाल बावनकुळेंनी लक्षात ठेवावं, ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचाय”
वैफल्यग्रस्त कोण झालं आहे? हे टिका करणाऱ्यांना आम्हाला सांगण्याची गरज नाही. खोट सांगून तुम्ही अनेक आमदारांना फोडले. हे आधी पाहा. तुमच्याबरोबर जे आमदार आहेत. त्याचं आधी मत काय आहे ? हे पहावं. वैफल्यग्रस्त आम्ही नाही. तर भाजप झाली आहे. ते सत्तेशिवाय राहू शकतन नाहीत. येनकेन प्रकारे सत्ता कशी मिळवता येईल ? त्यातून पैसा आणि परत त्याच पैशातून सत्ता कशी मिळवता येईल? हे काम भाजप करत आहे. खोक्यांचा विचार त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे ही त्यांची मानसिकता आहे. आमची नाही. असा पलटवार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
हेही वाचा…“ते मला फडतूस, लाचार टरबूज्या, छोटा भीम …”, राष्ट्रवादीची फडणवीसांवर जहरी टिका
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी खुप संयम बाळगला. ते उध्दट किंवा उद्धवस्त ठाकरे म्हणाले नाही. ही संस्कृती आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ सुरू आहे. हा खेळ लोक ओळखतात. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असून, ती बिलकूल मिळणार नाही. आम्हालाही तिखट बोलता येते. आमच्याकडे बरेचसे काय काय आहे. पण आम्ही मर्यादा पाळून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलेन. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं
हेही वाचा…भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या
हेही वाचा…“सततचा पाऊस ही राज्य सरकारकडून आता नैसर्गित आपत्ती घोषित”, राज्य सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…“माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, सामने आओ..! तुम्हे तुम्हारा नाम भूला देंगे” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं ओपन चॅलेंज
हेही वाचा…सभा ठाण्यात, अंधारेंनी धूर काढला पुण्यात ! भाजप नेत्याचा डान्सबारमधला विषय चव्हाट्यावर