मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला बहुचर्चित असलेला ५ जूनचा अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे आज सकाळी जाहीर केले. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचले. शिवसेनेचे देशात अनेक ठिकाणी मदत कक्ष आहेत. जर राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत काही मदत मागितली असती तर आम्ही नक्कीच सहकार्य केले असते, असे खोचक विधान संजय राऊत यांनी केले. त्यावर आता भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा तुम्ही काय प्रेम दिलंत ते अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. त्यामुळे संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
महाविकासआघाडीची नवी रणनीती; राज्यसभेसाठी देखील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महायुती
एका मराठी वृत्तवाहिनीशी चर्चा करताना प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी आपला दौरा स्थगित केला आहे. रद्द केला नाही. त्यामुळे ते नक्कीच अयोध्येला जातील. २२ मे रोजी त्यांची पुण्यात सभा असून, यावेळी ते स्पष्टीकरण देणार आहेत. त्यानंतरच आपल्याला दौरा स्थगित करण्यामागचे कारण कळू शकेल. त्याआधी काही भाष्य करणे योग्य होणार नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
“रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
भाजपाने राज ठाकरे यांच्यासोबत असे का करावे? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावरून टोला लगावला होता. त्यालाही प्रवीण दरेकर यांनी सडेतोड उत्तर दिले. कोण कोणाचा वापर करून घेत आहे, यावर संजय राऊतांनी भाष्य करू नये. ते आज राष्ट्रवादीचा भोंगा म्हणून उत्तम भूमिका निभावताना संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. शिवसेनेचा राष्ट्रवादी पक्ष कसा वापर करून घेत आहे आणि शिवसेना कशी रसातळाला जात आहे हे निवडणुकीत, संघटनेत आणि जनतेच्या मनात दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून संजय राऊत योग्य काम करत असल्याचे म्हणत निशाणा साधला.
संजय राऊत कोण आहेत? आमच्या लेखी फार महत्त्वाचा माणूस नाही – फडणवीस
राज ठाकरे आणि भाजपचं काय होणार हे हळूहळू कळेल. आधी तुमच्या पक्षाची काय दुर्दशा होत आहे याकडे आधी लक्ष घाला. जनता काही मूर्ख नाही. संजय राऊत जे शहाणपण दाखवत आहेत ते अख्खा महाराष्ट्र बघत आहे. महाविकास आघाडी सरकार बनत असताना राऊतांनी संपूर्ण शिवसेना शरद पवारांच्या पायाशी नेऊन ठेवण्याचे शहाणपण केले, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
Read also:
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
- ‘ज्यांनी रातोरात आमचे नगरसेवक चोरले ते काय मदत करणार?’ – संदीप देशपांडे
- “ते सोबत असले तर आम्हाला काही चिंता नाही, सुरक्षा आपोआपच मिळेल”; नांदगावकरांचा संजय राऊतांना टोला
- आदित्य ठाकरे अयोध्येला जाताहेत, कुणाची इच्छा असेल तर..; राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टिप्पणी
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं