पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षा मंडळ आयोजित सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार आणि लोकांच्या संपर्कातील महत्व पटवून सांगताना स्वत:ला नेहमी मी कार्यकर्ताच मानत आलो असल्याचं म्हटलं आहे.
“पुणे महापालिकेत 100 पेक्षा नगरसेवक निवडून आणून फडणवीसांना गिप्ट देणार”; जगदीश मुळीक
लहानपणीपासून मी असाच राहिलो आहे, जगलो आहे. युवासोबत राहिलो आहे. त्यांच्यासोबत काम करायला मला आवडतं . स्वत:ला नेता मानत नाही तर स्वत:ला पक्षाचा एक कार्यकर्ता मानतो. लोकांच्या संपर्कात राहणं फार महत्वाचं असत, जे महाराष्ट्रात जे घडलं काही तरी कारण सांगितलं जातात. जे कारण दिली जातायत ते मतदारसंघातील लोकांना शांत करण्याचं काम आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
“आढळराव पाटलांची सेनेतून बाहेर पडण्याची वेळ चुकली”; सचिन अहिरांचं वक्तव्य
राज्यात सुद्धा बदल करण्याची गरज आहे, युवकांना संधी देण्याची गरज आहे, ताकद युवकांना देण्याची गरज आहे. पवारसाहेबांनी का असा निर्णय घेतला माहीत नाही, ज्या जिल्ह्यात जसं समीकरण असं तशा निवडणुका लढवल्या जातील, जिकडे सेनेची ताकत जास्त आहे तिकडे मदत घेतली जाईल, महाविकास आघाडीचं एॅग्रिमेंट झालं होतं ते आता अस्तित्वात नाही असंही रोहित पवार म्हणाले.
“माझ्या हिमंतीवर मी निवडून येतो, मला कुणाची गरज नाही”; शिवाजीराव आढळराव पाटील
दरम्यान, काल अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शहरात अनेक उपक्रम राबविण्यात आले. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात चांगलीच पोस्टरबाजी रंगली होती.
Read also
- “शिवसेना सोडली, तेव्हा पक्षप्रमुखांनी नारायण राणेंना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या”
- गृहमंत्रिपद मिळाल्यास तरच सरकारमध्ये सामील होऊ; अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य
- “जरंडेश्वर कारखान्याची 10000 कोटींची बेनामी संपत्ती लवकरच ताब्यात घेऊ”; अजित पवारांना शिंदे गटाच्या आमदारांनी ललकारलं
- “मग त्यांनी ‘या’ दाढीला पकडलं, अन्..;”खैरेंचा एकनाथ शिंदे अन् फडणवीसांवर हल्लाबोल
- “आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही तेवढं आम्ही राजकारण केलंय”; रामदास कदमांचं ठाकरेंना प्रत्युत्तर