मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्यांमुळे चांगलचं चर्चेत आलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली आहे. त्यातच आता संजय राऊतांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. मोबाईलवर मेसज करून संजय राऊतांनी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊतांनी हा मेसेज आला आहे. दिल्ली में मिल AK-47 से उडा दुंगा असं मॅसेज म्हटलं आहे. संजय राऊतांना धमकी देणारा पुण्यातील असल्याची प्रथामिक माहिती सध्या मिळत आहे. या प्रकरणाबाबत पुण्यातील दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संजय राऊतांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे
संजय राऊत म्हणाले की, ही पहिल्यांदाच धमकी आली नाही. हे सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा हटवली. त्याबद्दल मी कुणाला पत्र लिहिलं नाही. पण वारंवार मुख्यमंत्र्यांचा मुलगा एक षडयंत्र रचतो. एका गुंडाला हाताशी धरून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचतो. त्याची माहिती दिल्यानंतर मी स्टंड करतो मी स्टंट करतो असं राज्याचे गृहमंत्री म्हणतात. अशी टिका करतानाच ज्या गॅंगने सलमानला धमकी दिली. त्यात गॅंगने मला धमकी दिली. पोलिसांना काही लोकांना पकडलं आहे. धमकी आल्यानंतर मी पोलिसांना कळवलं आहे. उद्दा मी कळवलं नाही. असं होऊ नाही म्हणून मी पोलिसांना कळवलं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका