मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेत अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच आता २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवाकार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर मधील घडलेली घटनेत भाजप आणि एमआयएमचा हात असल्याचा आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथे घडलेली घटना ही भाजप- एमआयएम च्या छुप्या मैत्रीचं फलित आहे. २०२४ च्या निवडणुकीअगोदर राज्यात सामाजिक वातावरण खराब करून राजकीय लाभ मिळवण्यासाठी अजून दंगली घडू शकतात. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…गिरीश बापटाचं निधन, पुण्याच्या लोकसभा जागेंवर काॅंग्रेसचा दावा, अजित पवारांनी चांगलचं खडसावलं
एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या संपुर्ण राज्यात सभा होत आहेत. या सभेला अजित पवार, नाना पटोले आणि यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. परंतु त्याआधी संभाजीनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळं वातावरण बिघडेल गोंधळ होईल. असा रिपोर्ट पोलिसांनी दिल्यास सरकार सभा थांबवेल. असं त्यावर बोलतांना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जलतरण तलाव १ एप्रिलपासून सगळ्यांसाठी खुला
तसेच महाविकास आघाडीच्या सभेवर तसेच छत्रपती संभाजीनगर शहरावत गृहमंत्री देवेंंद्र फडणवीस तसा निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री यावरती लक्ष ठेऊन आहेत. असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीची सभा होणार का ? हा मोठा सवाल निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांनी या सभेला काही अटी देखील घालून दिल्या आहेत.
छत्रपती संभाजी नगर येथे घडलेली घटना ही भाजप-MIM च्या छूप्या मैत्रीचं फलित आहे.2024 च्या निवडणुकीअगोदर राज्यात सामाजिक वातावरण खराब करून राजकीय लाभ मिळवण्यासाठी अजून दंगली घडू शकतात.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 31, 2023
Read also
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
हेही वाचा…““उद्या तो कालावधी संपेल, मग तेव्हा आपल्याला समजेल की,” महिला आयोगाचा संजय शिरसाठांना इशारा