छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर सध्या हे शहर चर्चेत आलं आहे. आज रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. तर त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“नरेश म्हस्केंची अजित पवारांनी इच्चतच काढली, आलतूफालतू म्हणत म्हस्केंच्या ‘त्या’ आरोपांवर दिले उत्तर”
राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याने यातून मार्ग काढून शांतता टिकवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करायला हवा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. जातीय सलोखा ठेवून मार्ग काढण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. आपल्या महापुरुषांची शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपली वागणूक ठरवावी, असे ते म्हणाले.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे सरकारला कोर्टाचा मोठा झटका..! कोर्टाने थेट आदेशच दिले, ठाकरे गटाच्या आमदाराची कोर्टात याचिका
विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना चांगलंचं सुनावणं आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाली आहेत. घाई करायची काय गरज आहे ? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही पंरपरा आहेत. अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील. असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
Read also
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
हेही वाचा…““उद्या तो कालावधी संपेल, मग तेव्हा आपल्याला समजेल की,” महिला आयोगाचा संजय शिरसाठांना इशारा
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल
हेही वाचा…गिरीश बापटाचं निधन, पुण्याच्या लोकसभा जागेंवर काॅंग्रेसचा दावा, अजित पवारांनी चांगलचं खडसावलं
हेही वाचा…आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जलतरण तलाव १ एप्रिलपासून सगळ्यांसाठी खुला