पुणे : टोलवाढीच्या विरोधात आपने मागील काही दिवसापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एप्रिल २०२३ पासून १८ टक्के टोल वाढ केली आहे. त्याच्या विरोधात काल आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली किवळे येथे महामार्गावर आज टोलवाढीचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा…““रोहित पवारांना ‘त्या’ निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनीच षडयंत्र रचला होता”, मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा
पुणे एक्सप्रेसवेवर टोल वाढल्याने आता प्रवशांच्या खिशाला झळ बसणार आहे. वैयक्तिक वाहन वापरकर्त्यांना १ एप्रिलपासून १८ टक्के वाढीव टॅक्समुळे खासगी बस आणि कॅबचे भाडे वाढणार आहे. मालवाहतुकदार, कारचालक यांना मोठा भुर्दंड बसणार आहे. २००८ च्या महामार्गशुल्क आकारणी नियमानुसार स्थानिक परिस्थितीनुसार टोल आकारणी केली पाहिजे. महामार्ग निर्मिती प्रकल्प खर्च व देखभाल यांच्यानुसार टोल वसुली जाटक असता नये. मात्र टोलवसुलीची कंत्राटदार कंपन्यांच्या लाभासाठी टोल दरवाढ केली आहे. असा संतोष इंगळे यांनी आरोप केला आहे.
हेही वाचा…कुणी मागे हटेना..! “हेंबाड्या, मटणकरी, औरंग्या, माकडाची कुंडली,” राष्ट्रवादी अन् मनसेत ‘ट्विट’ वार जोरात
आंदोलनास संतोष इंगळे,यशवंत कांबळे,मीनाताई चंद्रमणी जावळे,सरोज कदम,ज्योती शिंदे,संतोषी नायर,ब्रह्मानंद जाधव,हारून अन्सारी,राहुल नाईक,संजय मोरे,सचिन पवार,अमर डोंगरे,कमलेश रनवरे, रोहित सरनोबत,अजय द्विवेदी,अशोक शेडगे,दिलीप खुडे,दिलीप कुमार,विनोद सरोज,संजय मोरया,सुरेंद्र कांबळे आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Read also
हेही वाचा…गिरीश बापटाचं निधन, पुण्याच्या लोकसभा जागेंवर काॅंग्रेसचा दावा, अजित पवारांनी चांगलचं खडसावलं
हेही वाचा…आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जलतरण तलाव १ एप्रिलपासून सगळ्यांसाठी खुला
हेही वाचा…“नरेश म्हस्केंची अजित पवारांनी इच्चतच काढली, आलतूफालतू म्हणत म्हस्केंच्या ‘त्या’ आरोपांवर दिले उत्तर”
हेही वाचा…“एकनाथ शिंदे सरकारला कोर्टाचा मोठा झटका..! कोर्टाने थेट आदेशच दिले, ठाकरे गटाच्या आमदाराची कोर्टात याचिका
हेही वाचा…काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिताराजे यांच्याकडून पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र, राजकीय वर्तुळात चर्चा