पुणे : भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात दीर्घ आजारपणामुळे निधन झालं. त्यानंतर आता पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच निवडणुक लागणार आहे. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याच्या निर्णय काॅंग्रेसने घेतला आहे. काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी तसे स्पष्ट केलं आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना चांगलंच सुनावणं आहे.
हेही वाचा…कुणी मागे हटेना..! “हेंबाड्या, मटणकरी, औरंग्या, माकडाची कुंडली,” राष्ट्रवादी अन् मनसेत ‘ट्विट’ वार जोरात
आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं. प्रत्येकवेळी भाजप लढली आहे. त्यामुळे आम्हीही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच काहीच समजत नाही”, अन् फडणवीसांनी विरोधी पक्षाला सुनावलं
विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना चांगलंचं सुनावणं आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाली आहेत. घाई करायची काय गरज आहे ? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही पंरपरा आहेत. अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील. असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
Read also
हेही वाचा…आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जलतरण तलाव १ एप्रिलपासून सगळ्यांसाठी खुला
हेही वाचा…“नरेश म्हस्केंची अजित पवारांनी इच्चतच काढली, आलतूफालतू म्हणत म्हस्केंच्या ‘त्या’ आरोपांवर दिले उत्तर”
हेही वाचा…“एकनाथ शिंदे सरकारला कोर्टाचा मोठा झटका..! कोर्टाने थेट आदेशच दिले, ठाकरे गटाच्या आमदाराची कोर्टात याचिका
हेही वाचा…काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिताराजे यांच्याकडून पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…““रोहित पवारांना ‘त्या’ निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनीच षडयंत्र रचला होता”, मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा