पुणे : चिंचवडमधील चऱ्होलीतील जलतरण तलावचा मुद्दा आम आदमी पार्टीने मांडून धरला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून लाखो रूपये खर्च करून वडमुखवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज जलतरंग तलाव करण्यात आलेला होता. तो जलतरण तलाव १ एप्रिल पासून खुला करण्यासाठी आम आदमी पार्टीकडून मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा…“..त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच काहीच समजत नाही”, अन् फडणवीसांनी विरोधी पक्षाला सुनावलं
चऱ्होलीतील जलतरण तलाव 1 एप्रिल पासून खुला होणार पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून लाखो रुपये खर्च करून चऱ्होली वडमुखवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज जलतरंग तलाव तयार करण्यात आलेला होता. या भागातील जनतेसाठी विशेषकरून लहान शाळकरी मुलांसाठी हा जलतरण तलाव बनविला गेला होता. परंतु गेली दोन वर्ष जलतरण तयार असूनही काही राजकारणी लोकांच्या मनमानी कारभारामुळे चऱ्होलीतील जलतरण तलाव लोकांच्या वापरासाठी खुला करण्यात आलेला नव्हता. असा हा गंभीर मुद्दा शहरातील आम आदमी पार्टी चे इम्रान खान यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच हा मुद्दा उचलून धरून त्या बाबत चे पत्रव्यवहार महापालिका प्रशासनास केला. परंतु त्यांनी लगेच दाखल घेतली नाही त्यांनतर आम आदमीचे भोसरी विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय काळजे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यासंदर्भात जलतरण तलाव सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा…“अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे”, अन् प्रदेशाध्यक्ष संतापले
प्रशासनाने दखल न घेतल्याने जलतरण तलाव सुरु होण्यासाठी दोनवेळा आंदोलन घेतले गेले. तसेच अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला शेवटी यश मिळालं असून ०१ एप्रिल २०२३ रोजी चऱ्होली वडमुखवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज जलतरंग तलाव तयार हा सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. सामान्य जनतेच्या कामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळेच हा जलतरण तलाव सुरू केला असल्याचे दत्तात्रय काळजे यांनी सांगितले.
Read also
हेही वाचा…“नरेश म्हस्केंची अजित पवारांनी इच्चतच काढली, आलतूफालतू म्हणत म्हस्केंच्या ‘त्या’ आरोपांवर दिले उत्तर”
हेही वाचा…“एकनाथ शिंदे सरकारला कोर्टाचा मोठा झटका..! कोर्टाने थेट आदेशच दिले, ठाकरे गटाच्या आमदाराची कोर्टात याचिका
हेही वाचा…काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिताराजे यांच्याकडून पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…““रोहित पवारांना ‘त्या’ निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनीच षडयंत्र रचला होता”, मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा
हेही वाचा…कुणी मागे हटेना..! “हेंबाड्या, मटणकरी, औरंग्या, माकडाची कुंडली,” राष्ट्रवादी अन् मनसेत ‘ट्विट’ वार जोरात