मुंबई : शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आपल्या जाहीर सभांमधून शिंदे गटातील आमदारांवर तुटून पडत आहेत. अनेकदा सुषमा अंधारे शिंदे गटातील नेत्यांवर कडाडून टिका करतांना दिसत आहेत. त्याला शिंदे गटाच्या आमदारांकडूनही सुषमा अंधारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी याप्रकरणाबाबत महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा…काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिताराजे यांच्याकडून पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र, राजकीय वर्तुळात चर्चा
आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी ठाण्यातील परळी पोलीस स्टेशन गाठलं. परळीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अंधारे यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
हेही वाचा…““रोहित पवारांना ‘त्या’ निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनीच षडयंत्र रचला होता”, मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा
आमदार संजय शिरसाट यांच्याबाबत सुषमा अंधारे यांची तक्रार राज्य महिला आयोगाला मिळाली. त्यानंतर आयोगाने संभाजीनगर पोलीस आयुक्तांना यासबंधी चौकशी करून कारवाई करण्याची आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. हा अहवाल ४८ तासांमध्ये सादर करण्यास सांगतले होते. उद्या तो कालावधी संपेल. तेव्हा आपल्याला समजेल की, पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली आहे. असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…कुणी मागे हटेना..! “हेंबाड्या, मटणकरी, औरंग्या, माकडाची कुंडली,” राष्ट्रवादी अन् मनसेत ‘ट्विट’ वार जोरात
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाठ यांनी दोन-तीन दिवसांपुर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल
हेही वाचा…गिरीश बापटाचं निधन, पुण्याच्या लोकसभा जागेंवर काॅंग्रेसचा दावा, अजित पवारांनी चांगलचं खडसावलं
हेही वाचा…आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जलतरण तलाव १ एप्रिलपासून सगळ्यांसाठी खुला
हेही वाचा…“नरेश म्हस्केंची अजित पवारांनी इच्चतच काढली, आलतूफालतू म्हणत म्हस्केंच्या ‘त्या’ आरोपांवर दिले उत्तर”
हेही वाचा…“एकनाथ शिंदे सरकारला कोर्टाचा मोठा झटका..! कोर्टाने थेट आदेशच दिले, ठाकरे गटाच्या आमदाराची कोर्टात याचिका