ठाणे : काल संपुर्ण राज्यात मोठ्या उत्साहात राम नवमीच्या निमित्ताने सण साजरा करण्यात आला. यातच नाशिक येथील काळाराम मंदिरात देखील राम नवमीच्या दिनानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यातच छत्रपती संयोगिता राजे यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यांची पोस्ट देखील त्यांनी केली आहे. त्याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याच पार्श्भूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे. आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातनांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे. त्या छत्रपती शाहू महाराजांना देखिल अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या.या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले.
हेही वाचा…““उद्या तो कालावधी संपेल, मग तेव्हा आपल्याला समजेल की,” महिला आयोगाचा संजय शिरसाठांना इशारा
महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजात बाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकविण्यासाठी पुढे केले. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट रचला गेला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता.
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल
पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहीले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोक वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे.
या देशाच्या घटनेत, बाबासाहेबांच्या संविधानात विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00वाजता यावे.आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात.
मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे. आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातनांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे… pic.twitter.com/tb3za6g7LU
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
Read also
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा