पुणे : राष्ट्रवादीत आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या राजकारणातील यशाबाबत, संधीबाबत अनेकदा चर्चा केली जाते आहे. यातच आता आमदार रोहित पवार यांना एका निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवार यांनी कोण कोणाला फोन केले होते. ? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे सध्या त्याची एकच चर्चा रंगली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी नरेश म्हस्के यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…““उद्या तो कालावधी संपेल, मग तेव्हा आपल्याला समजेल की,” महिला आयोगाचा संजय शिरसाठांना इशारा
नरेश म्हस्के तुम्हाला वाण नाही तर गुण लागला तर, सत्ताधारी पक्षाचा. महाराष्ट्रातील विकास कामे सोडून दुसऱ्याच्या कुटुंबात मुद्दाम गैरसमज पसवणारे चाळे बंद करून कामाकडे लक्ष द्या. विरलोच तुम्ही शिंदे गटाचे नाही का ? असा खोचक टोलाही त्यांनी हाणला. तुम्ही शिंदे शिवसेना गटाचे ना, मग गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा, पण पवार कुटुंबावर याचा कोणताच फरक पडत नाही. फक्त तुमची फोडाफोडी वृत्ती पुन्हा आधोरेखित झाली. असंही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर नो विकास ओनली बकवास असा हॅशटॅगही त्यांनी वापरला.
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत रोहित पवार उतरले होते. तेव्हा त्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी षडयंत्र रचला होता. त्यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी कोण कोणाला फोन केले होते. ते अजित पवार यांनी सांगावं. असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. तसेच पवार कुटुंबातील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होती ते अजित पवार यांनी सांगावं. त्यांनी अगोदर आपल्या घरातलं बघावं आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टिका करावी, असेही म्हस्के म्हणाले.
Read also
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका