पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे चार दिवस झाले आहेत. 4 दशकं पुण्याच्या राजकारणावर छाप असणारा नेता गेल्याने संपूर्ण शहर शोकाकुल आहे. मात्र दुसरीकडे पुण्यातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचा पाहायला मिळत आहे. आज पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्या निमित्ताने शहरभर बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र कल्याणी नगर भागात लागलेल्या एका बॅनरवर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असणाऱ्या पुण्याला नक्की झालंय काय ?, असा प्रश्न विचारण्यात येतोय.
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
अतिक शेख या मुळीक समर्थकाने कल्याणीनगर भागात जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावले होते. त्यावर जगदीश मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हे होर्डिंग्स हटवण्यात आले आहे. गिरीश बापट यांनी 4 दशकं पुण्याच्या राजकारण आणि समाजकारणावर आपली छाप सोडली होती. आज अनेक भाजपचे कार्यकर्ते नेते झालेत ते बापट यांच्याच मुशीत घडले आहेत. मात्र असा व्रतस्थ नेता गेल्या नंतर अवघ्या चारचं दिवसांत त्यांच्या जागेवर दावा ठोकल्याने पुणेकर संताप व्यक्त करत आहेत.
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, बापट यांना जाऊन चार दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा…““उद्या तो कालावधी संपेल, मग तेव्हा आपल्याला समजेल की,” महिला आयोगाचा संजय शिरसाठांना इशारा
राष्ट्रवादीची सडकून टीका
जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असे होर्डिंग्स लागल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत. भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा.’ असं म्हणत चव्हाण यांनी भाजपची आणि मुळीक यांची अक्षरशः लाज काढली आहे.
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल
जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द
लोकनेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणारे सर्व कार्यक्रम, उपक्रम रद्द करण्यात आले असल्याचं जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती.त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले.जनाची नाही मनाची तरी ठेवा. pic.twitter.com/pkwb21jl5I
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 31, 2023
१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार pic.twitter.com/NKLw3l7wVy
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
Read also
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे