छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आलं आहे. यातच विहीर मंजूर करून घेण्यासाठी एका अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याने एका सरपंचाने पंचायत समितीसमोरच २ लाखांच्या नोटा उधळत अनोखं आंदोलन केलं आहे. त्याचा काल व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत होतो. त्याची दखल आता मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे
छत्रपती संभाजीनगर येथील एका सरपंचाकडून विहीर मंजूर करून घेण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांनी लाच मागितली. त्यानंतर संप्तत संरपचाने आपल्या गळ्यात नोटांची माळ घालत फुलंब्री पंचायत समितीसमोर आंदोलन केलं. यावेळी सरपंचाने तब्बल २ लाखांची रोकड उधळवत संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
दरम्यान, सरपंचाचा हा व्हिडीओ व्हारल झाल्यानंतर संबंधित गटविकास अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मी २० वर्ष झाले आमदार आहे, मी २० वर्ष विरोधातही होतो. त्यावेळी आणि आताही मी राज्यभरात पाहतोय की अनेक ठिकाणच्या मागणीच्या गोष्टी पुढे येत आहेत. पैसे मागितले जात आहेत. जास्त लोकांची मागणी आल्यावर तुझा नंबर आधी लावतो, याचा नंबर लावतो या गोष्टी होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलणार आहोत. जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रथमदर्शनी बीडीओंना निलंबित केलं आङे. या संदर्भात चौकशी लावलेली आहे. अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
Read also
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य