पुणे : महाविकास आघाडीकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर तर महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात पुणे लोकसभेची लढत होणार आहे. त्यामध्ये आता वंचितकडून वसंत मोरे यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पुण्यात पाहिजे तसा प्रचाराला सुरूवात झालेली नाहीय. मतदानाला कमी दिवस शिल्लक असतांना कॉंग्रेसने प्रचाराला अद्यापही सुरूवात नसल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर मात्र मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
हेही वाचा...सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई
मोहोळांना मिळतोय विविध घटक आणि समाजांचा पाठिंबा
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ नियोजनबद्ध प्रचारात आघाडी घेतली आहे. मोहोळ हे दररोज समाजातील विविध घटकांची तसेच विविध समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातून त्यांचा सूक्ष्म पातळीवर प्रचार सुरू आहे. मोहोळ यांनी सांस्कृतिक,क्रीडा,महिलावर्ग,कामगार अशा विविध घटकांबरोबर प्रत्यक्ष भेटून त्यांच्या क्षेत्रातील अडीअडचणी समजून घेत आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रत्येक क्षेत्रासाठी केलेलं काम आणि भविष्यात काय करता येईल याबाबत चर्चा ते या घटकांबरोबर करताना दिसत आहे. त्यांनी अगदी पोस्टमन, पुणे वृत्तपत्र विक्रेता सारख्या दुर्लक्षित घटकांचीही भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे या घटकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,
दुसरीकडे मोहोळ हे दररोज वेगवेगळ्या समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. पाली जिल्हा जाट समाज, सिरवी क्षत्रिय समाज, श्री गोडवाड सिरवी क्षत्रिय समाज, बंट्स संघ, राजस्थानी समाज, स्वकुळ साळी समाज, बोहोरी समाज, सहस्त्र अर्जुन क्षत्रिय समाजाच्या त्यांनी गाठीभेटी घेत संपर्क केला आहे.
पुणे लोकसभेची भाजपा-महायुतीची उमेदवारी मोहोळ यांना मिळाल्याबद्दल त्यांचे या विविध समाजांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणावर या सर्वांनी विश्वास दर्शवत पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास या समाजांकडून व्यक्त केला जात आहे.
दिवसेंदिवस समाजातील विविध घटक आणि विविध समाजांकडून मोहोळ यांना मिळणारा पाठिंबा यामुळे मोहोळांचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.
READ ALSO :
हेही वाचा...जळगावात ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार , ३० माजी नगरसेवक फुटणार, राजकीय भुकंप अटळ
हेही वाचा…अन् वसंत मोरेंनी ससून रूग्णालयाला भेट दिला उंदिर पकडण्याचा पिंजरा, दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?