मुंबई : सोलगाव-बारसू येथील रिफायनरीविरूद्ध गेल्या काही दिवसापासून स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. या आंदोलना दरम्यान अनेकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. यातच आज शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्थानिकांशी संवाद साधला. त्याआधी उद्धव ठाकरे यांना बारसूत येऊ देणार नाही. असं केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता सामानातून राणेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
हेही वाचा…“ते पुन्हा आले खरं, पण…”,म्हणून नाना पटोलेंनी फडणवीसांना डिवचलं
उद्धव ठाकरे यांना बारसूत येऊ देणार नाही. असा इशारा राणेंनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यावर तुमच्या या पोकळ धमक्या बंद करा. येऊ देणार नाही, म्हणजे काय ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी बारसूत उतरतील त्यांना रोखून दाखवा. असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी राणे यांना दिला होता.
हेही वाचा…“नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक तुम्ही”, रूपाली पाटलांचा भातखळकरांनावर पलटवार
सोलगाव- बारसू येथील रिफायनरीविरूद्ध अहिंसेच्या मार्गानेच लढा सुरू आहे, ज्यांना अटका झाल्या ते जमिनी-शेतीचे मालक आहेत व आपल्या जमिनी वाचवण्यासाठी ते रस्त्यावर आले, पण त्यांना गुन्हेगार ठरवून तडीपार करायचे, तुरूंगात डांबायचे, गावागावांत पोलिसी बळाचा वापर करून दहशत निर्माण करायची आणि पुन्हा लोकांनी डिडकारलेल्या टिल्ल्या पिल्ल्यांनी रिफायनरीस लोकांचा विरोध नाही असे बोंबलून समर्थनार्थ मोर्चे काढायचे असं सामानातून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा ‘पावर गेम’, त्यामुळेच त्यांनी हा मोठा मास्टरस्टोक दिलाय”
दरम्यान, आज उद्धव ठाकरे बारसुत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे बारसुच्या समर्थानार्थ भाजपकडून मोर्चे काढण्यात येणार असल्याचं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यावरून सामानातून भाजपवर टिका करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जयंत पाटलांसाठी शरद पवार पाच मिनिटे थांबले, राष्ट्रवादीमधील बंड रोखण्यासाठी त्यांच्याकडे “नवी” जबाबदारी?
हेही वाचा…“गावोगावी, चौकाचौकात साखर वाटून साजरा आनंद करा, प्रदेशाअध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…“कुणाला जायचं असेल तर त्यांना मी..” , अजित पवारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“अखेर शरद पवाराच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम, पवारांची मोठी घोषणा”
हेही वाचा…रश्मी ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले की, “आमची भेट..”