मुंबई : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आग्राह आणि पदाधिकारी, राजकीय नेत्यांची मागणी यामुळे शरद पवार यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा काल पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर संपुर्ण राज्यात कार्यकर्त्यांनी फटाके पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी शरद पवार यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पुढे संधी देण्यात येईल असं भाकित केलं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांचं नाव सध्या चर्चेत आलं आहे.
हेही वाचा…“नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक तुम्ही”, रूपाली पाटलांचा भातखळकरांनावर पलटवार
आपली भूमिका मांडण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात केलं होतं. या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांशी शरद पवार यांनी जवळपास ५ मिनिटे पत्रकार परिषद थांबवून ठेवली होती. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. जयंत पाटील आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेला सुरूवात केली. त्यानंतर जयंत पाटलांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा…“शरद पवारांचा ‘पावर गेम’, त्यामुळेच त्यांनी हा मोठा मास्टरस्टोक दिलाय”
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचं वक्तव्य केलं. जिल्हा पातळीवरील नेतृत्वाला राज्य पातळीवर आणि देश पातळीवर संधी दिली जाणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपला उत्ताराधिकारी कोण असणार? यावर बोलण्याचं टाळलं. तसेच राष्ट्रवादीची नवी कार्यकारीणी लवकरच जाहीर करणार असल्याचं शरद पवार यांच्या बोलण्यातून दिसून आलं.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट, एन्ड होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया नाही”, देवेंद्र फडणवीस
दरम्यान, जयंत पाटील यांना सध्याच्या पदावरून बढती देऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. याने राष्ट्रवादीमधील अजित पवार यांच्या गटाला शांत करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजत आहे. मात्र जयंत पाटील यांना जरी प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले तरी नवा प्रदेशाध्यक्ष हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्याही संमतीनेच बनेल अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गावोगावी, चौकाचौकात साखर वाटून साजरा आनंद करा, प्रदेशाअध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…“कुणाला जायचं असेल तर त्यांना मी..” , अजित पवारांच्या प्रश्नांवर शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“अखेर शरद पवाराच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम, पवारांची मोठी घोषणा”
हेही वाचा…रश्मी ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले की, “आमची भेट..”
हेही वाचा…“ते पुन्हा आले खरं, पण…”,म्हणून नाना पटोलेंनी फडणवीसांना डिवचलं