मुंबई : भाजपच्या महिला पदाधिकारीनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यासंपुर्ण प्रकरणानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यावरून आता आव्हाडांना पक्षातून निलंबित करा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
“शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे
जितेंद्र आव्हाड यांंनी आज सकाळीच राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलं आहे. मात्र आव्हाड हे नौटंकी करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच शरद पवार आणि पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही. असं वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
“लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल
72 तासांच्या सर्व गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यानुसार हे गुन्हे दाखल झाले आहेत. तुम्ही रंगारी करत आहात महाराष्ट्रात. भाजप राज्यात असे चालणार नाही. आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नाहीत. देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांनी व्हिडीओ पाहावा आणि जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावं. अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read also
- “शाळेत माझ्या मुलीला पण विचारलं की, तुझ्या वडिलांनी..;” अन् जितेंद्र आव्हाडांच्या डोळ्यात पाणी
- “त्यांनी मला हात लावला, तेव्हा जी फिलिंग आली, ती…”; पीडित महिलेचा आव्हांडावर धक्कादायक आरोप
- “जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला..!” जंयत पाटलांची माहिती
- “आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले
- महिलांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवा..! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी