IMPIMP
Slogan of removing Modi, discussion about seat allocation; India Alliance meeting in Delhi Slogan of removing Modi, discussion about seat allocation; India Alliance meeting in Delhi

मोदी हटावचा नारा, जागावाटपाबाबत चर्चा ; इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : देशात अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर इंडिया आघाडीची प्रथमच दिल्लीत बैठक सुरू होत आहे. या बैठकीसाठी राज्यातील शरद पवारांसह उद्धव ठाकरे तसेच देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीत आता इंडिया आघाडी नेमकी कशाबबात चर्चा करणार ? त्याकडे लक्ष लागून राहिलंय.

हेही वाचा…“शरद पवारांचा कार्यकर्ता, जरांगेंसोबतही चांगले संबंध,” अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया 

तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रथमच दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आज काॅंग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. सर्व विरोधी पक्ष मोदी हटाव हीच भूमिका मतदारांसमोर मांडणार असल्याची शक्यता आहे. यातच या बैठकीत राज्यनिहाय जागा वाटपाबाबत आज चर्चा होऊन निर्णयावर सहमती होऊ शकते.

हेही वाचामराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसोबत सरकारची रणनीती ठरली ? 

दरम्यान, सध्या संसदेत सुरू असलेल्या खासदारांच्या निलंबणावर देखील यावर चर्चा होऊ शकते. तसेच आगामी निवडणुकीत इंडिया आघाडी खासदार निलंबणाचा मुद्दा वापरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी काळात देशभरात ४ ठिकाणी इंडिया आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. यातच दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने घेतलेल्या भुमिकेबाबत काॅंग्रेस आपली भूमिका मांडणार आहे. तर केरळबाबत डाव्या पक्षांसोबत काॅंग्रेस सहमती दर्शवणार का ? तेपण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…१४१ खासदारांचं निलंबन ;सुळे आणि कोल्हेंचं निलंबन, अनिल देशमुखांची केंद्र सरकारवर जहरी टिका 

हेही वाचासुप्रिया सुळे लोकसभेतून निलंबित ; लोकसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय 

हेही वाचा“वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात”, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

हेही वाचा“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली”, कुणी केली टिका ? 

हेही वाचा…“उगीच मी हुडी, गॉगल घालून फिरत नाही”, ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला